घरमुंबईराज्यातील विद्यार्थ्यांना शिकवणार पालिकेचे शिक्षक; ऑनलाईन वर्गामध्ये प्रवेशाची मुभा

राज्यातील विद्यार्थ्यांना शिकवणार पालिकेचे शिक्षक; ऑनलाईन वर्गामध्ये प्रवेशाची मुभा

Subscribe

राज्यातील अन्य जिल्ह्यातील शाळांमधील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या ऑनलाईन वर्गामध्ये प्रवेश घेण्याची मुभा दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये राज्य मंडळाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू या चार माध्यमांचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. हे वर्ग उत्कृष्ट अशा प्रशिक्षित शिक्षकांमार्फत घेण्यात येतात. त्यामुळे या शिक्षणाचा फायदा आता राज्यातील सर्व शाळांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील अन्य जिल्ह्यातील शाळांमधील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या ऑनलाईन वर्गामध्ये प्रवेश घेण्याची मुभा दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू या चार माध्यमांच्या पहिली ते आठवीच्या सर्व इयत्तांसाठी दररोज सकाळी ८ वाजल्यापासून ४५ मिनिटांच्या दोन तासिका आणि नववी व दहावीसाठी चार तासिकांचे लाईव्ह सेशन आयोजित करण्यात येते. या ऑनलाई वर्गामध्ये सहभागी होण्यासाठी पालकांना किंवा विद्यार्थ्यांना पालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. पालिकेकडून घेण्यात येणार्‍या या ऑनलाईन वर्गात प्रवेश घेण्यासाठी पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर ‘online admission from for MCGM school’ या लिंकवर अर्ज करावा. विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना ऑनलाईन वर्गात उपस्थित राहण्यासाठी लिंक व पासवर्ड देण्यात येईल. प्रवेश मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वर्गात नियमित उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन वर्गाची सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे. अध्ययन निष्पत्ती संबंधित विद्यार्थ्यांना प्रगतीपत्र किंवा ऑनलाईन वर्गात उपस्थित राहिल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -