घरमुंबईनाव भ्रष्टाचार निवारणाचे काम मात्र हप्तेवसुली आणि विनयभंग

नाव भ्रष्टाचार निवारणाचे काम मात्र हप्तेवसुली आणि विनयभंग

Subscribe

भ्रष्टाचार निवारणाच्या नावाखाली महिलांचा विनयभंग

भ्रष्टाचार आणि अपराध निवारण परीषद या नावाने बनावट संस्था काढून हप्तेवसुली करणार्‍या एका बोगस इसमाला दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहन कृष्णन असे या आरोपीचे नाव असून तो मालाडच्या महेंद्रनगर परिसरात राहात होता. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ऑगस्ट महिन्यात महेंद्रनगर परिसरात राहणार्‍या एका महिलेने त्याच्याविरुद्ध दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्वतःच स्थापन केलेल्या खाजगी संस्थेचे अध्यक्षपद भुषवून अनेकांकडून हप्तेवसुली करण्याचे कामसुद्धा तो करत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. मोहन कृष्णन महिलांचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत असल्याची तक्रार पीडित महिलेने दिंडोशी पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी त्याला २५ ऑक्टोबरला अटक केली.

मोहन कृष्णन हा आरटीआय कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालाडच्या महेंद्रनगर परिसरात तो वास्तव्याला आहे. परिसरातील महिलांचे येताना- जाताना व्हिडिओ बनवत असल्याचे त्याच परिसरात राहणार्‍या एका महिलेच्या लक्षात आले. संबंधित महीलेने याबाबत त्याला खडसावून सोडून दिले होते. मात्र पुन्हा एकादा तो तसेच प्रकार करत असल्याचे लक्षात येताच महिलेने त्याच्या कानाखाली लगावली. यावर आरोपी मोहन कृष्णन याने महिलेच्या डोक्याला मारहाण केली. पीडीत महिलेने यासंदर्भात दिंडोशी पोलिस ठाण्यात ऑगस्ट महिन्यात तक्रार केली होती. आरटीआयच्या माध्यामातून आणि बोगस संस्थेच्या नावाखाली त्याने आतापर्यंत अनेक जणांकडून खंडणी मागितल्याचा आरोपसुद्धा करण्यात आला आहे. मोहन कृष्णनवर विनयभंग आणि इतर गुन्ह्यांचे एकूण सहा गुन्हे नोंद असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली.

- Advertisement -

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करत मोहन कृष्णनला आम्ही २४ ऑक्टोबरसा अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध एकूण सात गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. तो जी संस्था चालवतो ती संस्थासुद्धा बनावट आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे, अधिक तपास आम्ही करत आहोत.
-राजाराम व्हणमाने,वरीष्ठ पोलीस निरीक्षक,दिंडोशी पोलीस ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -