घरमुंबईबाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणात राणे आणि गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणात राणे आणि गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक

Subscribe

मंत्री राणे यांचे भाषण थांबवण्याची मागणी सभापती गोऱ्हे यांनी नार्वेकर यांच्याकडे केली.  मी बसून बोलणाऱ्यांचे ऐकत नाही. मी काही थांबणार नाही, असे मंत्री राणे यांनी सांगितले. त्यानंतर मंत्री राणे यांनी भाषणाची सांगता केली. काही लोकांना माझे भाषण आवडत नाही. त्यांना माझे भाषण कडू लागत आहे, असे बोलून मंत्री राणे यांनी भाषण संपवले. 

मुंबईः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे सोमवारी विधिमंडळ सभागृहात अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात भाषण सुरु असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे व सभापती निलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

बाळासाहेबांनी मला काय सांगितलं हे मी सांगणार नाही. पण मला डिवचू नका, अन्यथा मी सर्व सांगेन असे सांगत मंत्री राणे यांनी कुठे आहे भुजबळ असे विचारले. त्यावेळी छगन भुजबळ हे सभागृहाबाहेर जात होते. त्यांनी मंत्री राणे यांना हात दाखवला. तेव्हा मंत्री राणे म्हणाले, बघा मला समर्थन देण्यासाठीच भुजबळ यांनी हात दाखवला आहे. यावर सभापती गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. मंत्री राणे यांचे भाषण थांबवण्याची मागणी सभापती गोऱ्हे यांनी नार्वेकर यांच्याकडे केली. मी बसून बोलणाऱ्यांचे ऐकत नाही. मी काही थांबणार नाही, असे मंत्री राणे यांनी सांगितले. त्यानंतर मंत्री राणे यांनी भाषणाची सांगता केली. काही लोकांना माझे भाषण आवडत नाही. त्यांना माझे भाषण कडू लागत आहे, असे बोलून मंत्री राणे यांनी भाषण संपवले.

- Advertisement -

यावेळी भाषणात मंत्री राणे म्हणाले, पुढे मंत्री राणे म्हणाले, काहीजण आता शिवसेना शिकवत आहे. पण साडेसातनंतर मातोश्रीवर माझी वेळ असायची. माझ्यापेक्षा इतर कोणाची वेळ होती का हे कोणालाही विचारा. आम्हाला साहेबांचे वेड होते. ते वेड का होते याचा विचार आताच्या नेत्यांनी करायला हवा. बाळासाहेब असते तर आता जे घडलं आहे ते घडलंच नसंत. तेव्हा बाळासाहेबांबद्दल कोणी काही बोललं तर त्याला उत्तर मिळायच. आता कोणीही येतय आणि काहीही बोलून जात आहे. पण त्याची प्रतिक्रिया काही उमटत नाही.

कोणतेही पद किंवा सत्ता नसताना बाळासाहेबांना मानसन्मान होता. आताच्या कोणत्याच नेत्याला तसा मानसन्मान मिळत नाही आणि मिळणारही नाही. आम्हाला साहेबांनी तयार केलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका, असा टोलाही मंत्री राणे यांनी यावेळी हाणला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -