घरमुंबईThe Kerala Story च्या निर्मात्याला भरचौकात फाशी दिली पाहिजे... राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने...

The Kerala Story च्या निर्मात्याला भरचौकात फाशी दिली पाहिजे… राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने केली मागणी

Subscribe

'द केरला स्टोरी' ही ३ महिलांची कथा आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्मात्याने ३२ हजार महिलांचे धर्मांतर झाल्याचे स्वतः कबूल केले आहे. अशा निर्मात्याला फाशी दिली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मुंबई – कथित लव्ह जिहादवर आधारित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) वरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कर्नाटकात भरसभेत या चित्रपटाबद्दल वक्तव्य केल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. भाजप शासित राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री केला जात आहे, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केरळ राज्य आणि तेथील महिलांची बदनामी करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याला भरचौकात फाशी देण्याची मागणी केली आहे.

गेल्या आठवड्यात ‘द केरला स्टोरी’ रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन (sudipto sen) यांनी केले. तर विपूल अमृतलाल शाह (vipul amrutlal shah) चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात नर्स बनण्याची इच्छा असलेल्या मुलींची कथा आहे. मात्र त्या ISIS च्या जाळ्यात अडकून दहशतवादी होतात. या चित्रपटात धर्म परिवर्तनाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला आहे. भाजप शासित उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी त्यांच्या राज्यात चित्रपटावर बंदी घातली आहे.

- Advertisement -

‘निर्मात्याला भरचौकात फाशी द्या’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातून केरळ राज्याची आणि तेथील महिलांचीही बदनामी केली गेल्याचा आरोप केला आहे. आव्हाडांनी टीव्ही 9 वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटले आहे, की ‘ISIS च्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या मुलींची अधिकृत आकडेवारी समोर येत आहे. ती फक्त तीन आहे. मात्र चित्रपट निर्मात्यांनी या तीनचे ३२ हजार करुन सांगितले. या निर्मात्याला भरचौकात फाशी द्यायला पाहिजे.’

- Advertisement -

आव्हाड म्हणाले, ‘केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षर राज्य आहे. केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे.’

‘परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले.’ असे जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण केरळमध्ये
‘केरळचा साक्षरतेचा दर 96 टक्के आहे. जो भारताचा 76 टक्के आहे. केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणारी लोक हे 0.76 टक्के आहेत. देशामध्ये ही आकडेवारी 22 टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये 6 टक्के आहे. आसाममध्ये 42 टक्के आहे.’

ज्या उत्तर प्रदेशने द केरला फाईल टॅक्स फ्री केला आहे, त्या उत्तरप्रदेशमध्ये बालमृत्यूचा दर 46 टक्के आहे, अशीही माहिती आव्हाडांनी दिली आहे. ‘केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या 7 टक्के अधिक’ असल्याचे आव्हाड म्हणाले.

‘चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आकडा फुगवला’
आव्हाड म्हणाले, ‘त्या चित्रपटामध्ये जी 32 हजार महिलांची कथा सांगितली गेली, त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की ही कथा फक्त 3 महिलांची आहे. चित्रपट चालवा यासाठी 32 हजार महिला सांगितल्या होत्या.’ यावरुनच आव्हाड संतप्त झाले आणि त्यांनी हा निर्माता कोण आहे, त्याला फासावर लटकवलं पाहिजे, असं म्हटलं आहे.

द केरला स्टोरी चित्रपटातून महिलांची बदनामी - जितेंद्र आव्हाड
द केरला स्टोरी चित्रपटातून महिलांची बदनामी – जितेंद्र आव्हाड

‘द केरला स्टोरी’ चित्रपटातून आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत त्यांना काही समजतच नाही, त्या वाटेल तश्या वागतात असे प्रदर्शित करायचं आणि शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला ह्या गौण आहेत असं चित्र उभं करायचं. हेच केरळ वर आधारीत चित्रपटाच खरं सत्य आहे.’ असंही आव्हाड म्हणाले.

असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात. असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -