rajyasabha election : दोन मतांसाठी राष्ट्रवादी जाणार न्यायालयात

NCP to file petition in court for Nawab Malik and Anil Deshmukh's right to vote in Rajya Sabha elections
rajyasabha election : दोन मतांसाठी राष्ट्रवादी जाणार न्यायालयात

राज्यसभेच्या 6 आणि विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक लागली आहे. राज्यसभेच्या 6 व्या आणि विधान परिषदेच्या 10 व्या जागेवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक किती महत्वाची आहे याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक हे केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. ही मते महाविकास आघाडीसाठी महत्वाची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

त्या मतदानासाठी राष्ट्रवादी जाणार न्यायालयात –

भाजपचे दोन, काँग्रेसचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि शिवसेनेचा एर असे पाच सदस्य राज्यसभेवर भाजपच्या कोट्यातुन निवडून येणार आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेनेने उमेदवार दिला आहे. यावर आमची मतेही शिवसेनेला देणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते जनता दरबार उपक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधत होते

यामुळे घोडेबाजाराच्या चर्चा –

राज्यसभेच्या निवडूकीत मत दाखवून मतदान केले जाते. त्यामुळे घोडेबाजार होणा नाही. मात्र, अपक्ष मतदान दाखवत नसल्यामुळे ही चर्चा सुरू आहे. कमी पडणारी मते सेना आणि भाजपला लागणार आहेत. काही अपक्ष शिवसेनेकडे तर काही आमच्याकडे आहेत. काही भाजपकडे ही आहेत. त्यामुळे घोडेबाजाराच्या चर्चा सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार –

मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस गंभीर विचार करत आहे. न्यायालयात जात आहोत. मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यासंबंधाची परवानगी न्यायालयाकडे मागणार आहोत. प्रयत्न कसोशीने करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.