घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेवर एसी लोकलच्या आणखी 10 फेऱ्या वाढणार

मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या आणखी 10 फेऱ्या वाढणार

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीटांचे दर कमी केल्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीटांचे दर कमी केल्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सीएसएमटी येथील मध्य रेल्वे मुख्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सागितले. (new 10 ac local will add on central railway line)

मध्य रेल्वे मार्गावरील वाढवण्यात आलेल्या एसी लोकल ठाणे-सीएसएमटी-ठाणे अप आणि डाउन मार्गावर चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. बहुतांश फेऱ्या सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या चालवण्यात येणार आहेत. 8 जलद लोकल बदलापूरपर्यंत आणि 2 धीम्या लोकल ठाणे, तसेच कल्याणसाठी सोडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यामुळे एकूण एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या 66 वर पोहोचली आहे. सध्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळादरम्यान एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत आहेत. या लोकलच्या दररोज 56 फेऱ्या होतात. अल्प प्रतिसादामुळे 5 मेपासून एसी लोकलच्या तिकीट दरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर एसी लोकलच्या काही फेऱ्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे आणखी 10 फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

8 नवीन अतिरिक्त एसी लोकल

- Advertisement -

पश्चिम रेल्वे मार्गावरील या 8 नवीन अतिरिक्त एसी लोकल फेऱ्यांपैकी 4 डाऊन दिशेने आणि 4 अप दिशेने धावणार आहेत. अपच्या दिशेने विरार-चर्चगेट, बोरिवली-चर्चगेट, मालाड-चर्चगेट आणि भाईंदर-चर्चगेट या मार्गावर प्रत्येकी एक सेवा आहे. त्याचप्रमाणे डाऊन दिशेने चर्चगेट-विरार, चर्चगेट-बोरिवली, चर्चगेट-मालाड आणि चर्चगेट-भाईंदरदरम्यान प्रत्येकी एक सेवा आहे.


हेही वाचा – इंदूरमध्ये स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असताना बॉम्बस्फोट; 2 ठार, 14 जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -