Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईत नो किसिंग झोन!अश्लिल कृत्य करणाऱ्या जोडप्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांची योजना

मुंबईत नो किसिंग झोन!अश्लिल कृत्य करणाऱ्या जोडप्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांची योजना

जोडपी भर रस्त्यात खुलेआम अश्लिल कृत्य करतात

Related Story

- Advertisement -

भारतात पाश्चिमात्य संस्कृतिचा वावर आता वाढतांना दिसत आहे. याचप्रमाणे प्रत्येकाने सकारात्मकतेने याचा स्विकार केला आहे. आपण विविध शहरांमध्ये किंवा देशामध्ये लोकांच्या सुरक्षिततेसाठी किंवा त्यांना सुचित करण्यासाठी वेगवेगळे झोन तयार करण्यात येतात. यामध्ये नो पार्किंग झोन,नो हॉकिंग झोन अशा झोनची वर्गवारी करण्यात येते. या ठिकाणी देण्यात आलेल्या संदेशानुसार ती गोष्ट करण्यास मज्जाव करण्यात येतो. मात्र आता मुंबईत एका नव्या झोनची चर्चा चांगलीच रंगत आहे. हा झोन आहे नो किसिंग झोन. प्रत्येकाला हे ऐकून नक्कीच नवल वाटेल. मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे असलेल्या जॉगर्स पार्कजवळ हा झोन तेथील स्थानिक नागरिकांनीच घोषित केला आहे.
बोरिवली पश्चिम येथे असलेल्या जॉगर्स पार्कजवळ अनेक वरिष्ठ नागरिक तसेच राहीवासी व्यायाम,फेरफटका मारण्यासाठी रोज येताता.याचदरम्यान तरुण जोडपी भर रस्त्यात खुलेआम अश्लिल कृत्य करतात यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या जोडप्यांना आळा घालण्यासाठी रस्त्यावर नो किसिंग झोन असं लिहिलं आहे. बोरिवलीच्या चिकुवाडीतील सत्यम शिवम सुंदरम सोयटीजवळच हा जोगर्स पार्क आहे.

हे एक हाय प्रोफाईल क्षेत्र आहे. आणि या क्षेत्राच्या मध्यभागी एक सुंदर गार्डन रहिवाश्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. या ठिकणी जोडपी नेहमी वावरतांना दिसतात या सर्व कृत्यांवर काही तरी ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यावर NO KISSING ZONE असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे या उपाययोजनेचा योग्य परिणाम झाला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – यंदा लालबाग राजाची मूर्ती विराजमान होणार, भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार

- Advertisement -