Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई महाराष्ट्रात ‘एक राज्य एक गणवेश योजना’; शिक्षण मंत्र्यांची घोषणा, पण मिळणार कधी!

महाराष्ट्रात ‘एक राज्य एक गणवेश योजना’; शिक्षण मंत्र्यांची घोषणा, पण मिळणार कधी!

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात पुढील महिन्यात शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य एक गणवेश’ योजना अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून सर्व सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश लागू होईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी दिली. मात्र गणवेश मिळणार कधी हा प्रश्न अजूनही तसाच आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, एक राज्य एक गणेवश ही संकल्पना या वर्षापासून आम्ही अस्तित्त्वात आणतो आहोत. त्यामुळे यावर्षीपासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतले विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. परंतू काही शाळांनी सरकारच्या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी तीन दिवस शाळेने ठरवून दिलेला गणवेश आणि तीन दिवस सरकारने ठरवून दिलेला गणवेश वापरतील, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. तेशाळेने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस परिधान करतील. तर उर्वरीत तीन दिवस सरकारने ठरवून दिलेला गणवेश परिधान करतील, असा पर्याय काढला असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

- Advertisement -

सरकारी गणवेश ‘या’ रंगाचा
मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट, तर मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असा गणवेश ठरवण्यात आला आहे. याशिवाय ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल त्या मुलींना गडद निळ्या रंगाची सलवार आणि कमीज आकाशी रंगाची असेल. मुलांना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली पाहिजे या भावनेतून आम्ही रंग एकसारखा ठेवण्याच निर्णय घेतला असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा गणवेश हा स्काऊट गाईडशी साधर्म्य साधणारा असेल आणि विद्यार्थ्यांना सरकारकडून बूट आणि मोजेही देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी टापटीप आणि छान दिसतील. याआधी ग्रामीण भागात अनवाणी मुलं शाळेत जात होती, पण आता तसं होणार नहाी. सरकारकडून याआधी मागासवर्गीय मुलांना गणवेश देण्यात येत होता, पण आता सर्व मुलांना गणवेश दिला जाणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

सरकारी शाळांसाठीच आमचा निर्णय
दीपक केसरकर म्हणाले की, गणवेशाचा निर्णय शासकीय शाळांसाठीच आहे. मात्र खासगी शाळांनी देखील याचा विचार केला पाहिजे. मी एकदा शैक्षणिक संस्थांसोबत बसणार आहे. त्या मुलांनाही गणवेश दिला जाईल. खासगी शाळा चालक यासाठी पुढे येणार का? हा प्रश्न आहे. परंतु आमच्यासाठी मुलांचे हित हे सर्वोच्च आहे, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -