राज ठाकरेंनी दिलेले पत्र वाटणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याचा (Mosque loudspeakers) विषय कायमचा संपवण्यासाठी घरोघरी पत्रक (letter) पोहचवण्यासाठी सांगितले आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याचा (Mosque loudspeakers) विषय कायमचा संपवण्यासाठी घरोघरी पत्रक (letter) पोहचवण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार मनसे कार्यकर्ते (MNS Workers)आज राज्यामध्ये नागरिकांच्या घरामध्ये जाऊन त्यांना हे पत्र देत आहेत. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात का, घेतले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, यावर आता मनसेकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना हे पत्रक घरोघरी पोहोचवावे, असे आदेश दिले. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईच्या चेंबूर परिसरात मनसैनिकांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन राज ठाकरेंनी दिलेले पत्र वाटायला सुरूवात केली. शिवाय चेबूरच्या अनेक भागात या पत्राचे बॅनरही लावले आहेत. मात्र, राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करत असताना, या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कार्यकर्त्यांना का ताब्यात घेतले याबाबत अद्याप माहिती अस्पष्ट आहे.

हेही वाचा – हिंदूंना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत; मनसेची केंद्र सरकारकडे मागणी

राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत (Pune Sabha) या पत्राबाबत वक्तव्य केले होते. त्यानुसार त्यांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून लिहिले आहे.

  • जिथे-जिथे आवाजाच्या नियमाचे पालन होत नसेल तिथे-तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावे.
  • लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करून पोलिसांना सतत माहिती देऊ शकता.
  • माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा.
  • कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.

हेही वाचा – हिंदूंना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत; मनसेची केंद्र सरकारकडे मागणी