घरमुंबईमुंबईची हवा मध्यम दर्जाची, बीकेसीत अतिशय वाईट

मुंबईची हवा मध्यम दर्जाची, बीकेसीत अतिशय वाईट

Subscribe

मुंबई उपनगराच्या अनेक परिसरातील हवा ही शनिवारी मध्यम दर्जाची असल्याची नोंद सफर या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणाऱ्या प्रणालीने केली आहे. तर, फक्त बीकेसी म्हणजेच वांद्रे कुर्ला संकुल या परिसरातील हवा या वातावरणातही अतिशय वाईट नोंदवण्यात आली आहे.

डिसेंबर महिना सुरू झाला की मुंबईकरांना थंडी अनुभवायला मिळते. तसंच, काहीसं वातावरण सध्या मुंबईत आहे. सकाळी आणि संध्याकाळी अचानक हुडहुडी भरत आहे. पण, दुपारच्या काळात सूर्य डोक्यावर आला की, तापमानात थोडा बदल झालेला दिसतो. तरीही, वातावरणातला गारवा कमी होत नाही. ही मजा जरी अनुभवत असलात तरी सध्या मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही मध्यम दर्जाची असल्याचं समोर आलं आहे.

बीकेसीत हवा अतिशय वाईट

मुंबई उपनगराच्या अनेक परिसरातील हवा ही शनिवारी मध्यम दर्जाची असल्याची नोंद सफर या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणाऱ्या प्रणालीने केली आहे. तर, फक्त बीकेसी म्हणजेच वांद्रे कुर्ला संकुल या परिसरातील हवा या वातावरणातही अतिशय वाईट नोंदवण्यात आली आहे. या परिसरात वातावरण सर्वांधिक प्रदूषित नोंदवण्यात आलं असून हवेची गुणवत्ताही खालावली आहे. 

वरळीची हवा समाधानकारक

‘सफर’ ने नोंदवलेल्या गुणवत्तेनुसार शुक्रवारी वरळीची हवा समाधानकारक होती. तर, भांडूप, कुलाबा, मालाड, माझगाव, बोरीवली,  चेंबूर आणि नवीमुंबई या परिसरातील हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे, या बदलत्या वातावरणाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. मुंबईकरांना सध्या सर्दी, खोकला, ताप आणि पडसं अशा अनेक आजारांनी ग्रासलं आहे. वाहनांची वाढती संख्या, वाढती बांधकामे, इतर प्रदूषणामुळे वातावरणावर धूरक्यांचे सावट आहे. धूळ, धूर, धूके वातावरणाच्या खालच्या स्तरावर साचत आहे. शहर आणि उपनगरातील तापमानात कमाल आणि किमान यामध्ये बरीच तफावत असून तापमानात सातत्याने बदल नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे निर्माण होत असलेले धूरके धोकादायक ठरत आहे.

मुंबई प्रदूषणही वाढले 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत थंडी थोड्या प्रमाणात कमी झाली होती. पण, बुधवारपासून पुन्हा थंडी जाणवायला लागली. दरम्यान, धूरक्यामुळे मुंबईला प्रदूषणाने वेढल्याचे चित्र होते. मुंबई शहर आणि पूर्व उपनगराचा विचार करता पश्चिम उपनगरातील वातावरण अधिकच प्रदूषित असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. ‘सफर’ या संकेतस्थळावर वातावरणातील प्रदूषणाची नोंद केली जाते. ‘सफर’वरुन मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबईतील हवा मध्यम दर्जाची होती. भांडुप, कुलाबा,मालाड,चेंबूर आणि नवी मुंबई या परिसरातील हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -