घरदेश-विदेशपुण्याची जनता सहकारी आणि मुंबईतील मर्कंटाईल बॅंकेला १३ लाखांचा दंड; ठेवी सुरक्षित

पुण्याची जनता सहकारी आणि मुंबईतील मर्कंटाईल बॅंकेला १३ लाखांचा दंड; ठेवी सुरक्षित

Subscribe

नवी दिल्लीः रिझर्व्ह बॅंकेने पुण्यातील जनता सहकारी बॅंकेला आणि मुंबईतील बाॅम्बे मर्कंन्टाईल को आँपरेटिव्ह बँकेला प्रत्येकी १३ लाखांचा दंड ठोठावला आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने देशभरातील काही बॅंकांवर कारवाई केली. त्यात पुण्यातील जनता सहकारी आणि मुंबईतील बाॅम्बे मर्कंन्टाईल को आँपरेटिव्ह बँकेवर कारवाई करण्यात आली. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहे, असेही रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे.

देशभरातील बॅंकांचा रिझर्व्ह बॅंक आढावा घेत असते. नियमांचे पालन केले जात आहे की नाही. टाळेबंदचा तपशील व्यवस्थित आहे की नाही याची तपासणी केली जाते. सर्व सहकारी बॅंकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. रिझर्व्ह बॅंकेच्या सर्व्हेक्षणात काही दोष आढळल्यास त्या बॅंकेवर कारवाई केली जाते. गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने देशभरातील बॅंकेचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात काही बॅंकांच्या कार्यप्रणालीत दोष आढळला. अशा बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेने कारवाईचा बडगा उगारला. त्यात  पुण्यातील जनता सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने १३ लाखांचा दंड ठोठावला तर तामिळनाडू शिखर सहकारी बँकेला १६ लाखांचा, बाॅम्बे मर्कंन्टाईल को आँपरेटिव्ह बँकेला १३ लाखांचा आणि राजस्थानातील बरण नागरिक सहकारी बँकेला २ लाखांचा दंड ठोठावला आहे.

- Advertisement -

रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून महिन्यांपासून गृहकर्ज प्रचंड महाग होत आहेत. वाढत्या महागाईमुळे गृहकर्ज घेणे सर्वसामान्यांना कठीण जात आहे. २०१९च्या तुलनेत यंदा मुंबई व ठाण्यात घरांची विक्री वाढल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत नाईट फ्रँक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, मुंबईत २०२३ च्या पहिल्या तिमाहीत निवासी मालमत्तांची विक्री १ टक्क्याने वाढली, नवीन मालमत्ता १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

२०२३ च्या पहिल्या तिमाहीत मुंबईत २० हजार ३०० घरांची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर विक्रीच्या बाबतीत बंगळुरू आणि पुण्याचा क्रमांक आहे, असे नाईट फ्रँकच्या अहवालात म्हटले आहे. भारतातील प्रमुख आठ शहरांत नवी मुंबईतील निवासी बाजारपेठ कालखंडात ७९ हजार १२६ घरे विकली गेल्याचे समजते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -