ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबीयांची एसीबी करणार चौकशी, ‘हे’ आहे कारण

राजन साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला २० मार्च रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राजन साळवींच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Rajan Salvi Family ACB

Rajan Salvi Family Gets Anti Corruption Bureau Notice : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तिसरे आमदार राजन साळवी गेल्या अनेक दिवसांपासून एसीबीच्या रडावर होते. राजन साळवी यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा एसीबीने नोटीस बजावली आहे. राजन साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला २० मार्च रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राजन साळवींच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घराचीही पाहणी एसीबीकडून करण्यात आली होती. तसेच त्यांना चौकशीसाठीही बोलावण्यात आलं होतं. आता त्यांच्या कुटुंबीयांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. आतापर्यंत जवळपास तीन वेळा राजन साळवी हे अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजर राहिले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या स्वीय सहाय्यकाचीही चौकशी करण्यात आली.

यावर प्रतिक्रिया देताना राजन साळवी यांनी संताप व्यक्त केलाय. मला नोटीस पाठवल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना नोटीस पाठवण्याची गरज काय? असा प्रश्न राजन साळवींनी उपस्थित केला आहे. आजच सकाळी माझी पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनी यांना एसीबीची नोटीस आली आहे. २० मार्चला त्यांना अलिबागच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. ही दुर्दैवी बाब आहे. मी यापूर्वीही अनेकदा सांगितलं आहे की, सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शिवसैनिक आमदार झालेला आहे. राजन साळवी काय आहे, हे माझ्या मतदारसंघाला माहीत आहे. नोटीस आल्यावरच मी जाहीर केलं होतं की, मी याप्रकरणात संपूर्ण सहकार्य करेल आणि तसं करतोय.”, असं देखील राजन साळवी म्हणाले.

आज सकाळी माझी पत्नी अनुजा साळवी, मोठे बंधू दीपक साळवी आणि वहिनी अनुराधा साळवी यांना एसीबीची नोटीस आली. तसंच उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांना टार्गेट केलं जातंय, हे सत्य आहे. कारण वैभव नाईकला पहिली नोटीस आली, दुसरी नोटीस मला आणि तिसरी नोटीस नितीन देशमुख यांना आली, असं देखील राजन साळवी म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आले होते. राजन साळवी यांचा बंगला आणि रत्नागिरीतील हॉटेल यांचे मुल्यांकन करण्यात आले अूसन घर आणि हॉटेले क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग यांचेही मुल्यांकन करण्यात आले आहे. या अंतर्गत अधिक माहितीसाठी आता साळवी कुटुंबीयांची चौकशी केली जाणार आहे.