घरमुंबईमुंबईसह २७ महापालिकांच्या महापौरपदाचे आज आरक्षण

मुंबईसह २७ महापालिकांच्या महापौरपदाचे आज आरक्षण

Subscribe

मुंबई महापालिकेसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत आज बुधवारी दुपारी ३ वाजता मुंबईतील मंत्रालयाच्या विस्तार इमारतीत काढण्यात येणार आहे. मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर खुल्या प्रवर्गातील आहेत. आतापर्यंत ओबीसी पुरुष आणि अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गाचे आरक्षण दीर्घकाळानंतरही पडलेले नाही. त्यामुळे मुंबईत या दोन्ही प्रवर्गापैंकी एक आरक्षण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेसह ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नवी मुंबई, लातूर, पुणे, पिंपरी चिंचवडसह एकूण २७ महापालिकेच्या महापौरपदाची अडीच वर्षांची मुदत संपत आल्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली. ही मुदत ८ डिसेंबरपर्यंत असून त्यापूर्वी हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक घेणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेत भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेची सत्ता असून त्यांच्याशी युती तोडल्यामुळे महापौरपदाची निवडणूक रंगतदार होणार आहे.

- Advertisement -

तर नाशिकचे पंधरावे महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आल्यावर आरक्षणाचा फायदा मिळून रंजना भानसी यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती.

या महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण पडणार

- Advertisement -

मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नगर, पिंपरीचिंचवड, पुणे, चंद्रपूर, मिरा भाईंदर, नवी मुंबई, पनवेल, नांदेडवाघाळा, अमरावती, सांगलीमिरज कुपवड, जळगांव, चंद्रपूर, भिवंडी, लातूर, मालेगाव, धुळे, अकोला, उल्हास नगर, परभणी, सोलापूर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -