घरमुंबईमुरूड तालुक्यातून 62 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुरूड तालुक्यातून 62 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Subscribe

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता मुरूड तालूक्यातून एकूण 62 हजार 263 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये 480 दिव्यांग मतदार असून महिला 169 तर 311 पुरूष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रायगड जिल्ह्यातून एकूण 16 लाख 37 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मुरूड तालुक्यातून मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून यामध्ये 30 हजार 815 पुरुष तर 31 हजार 448 महिला मतदार मतदान करणार आहेत. रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे व युतीचे अनंत गीते यांच्यात सरळ लढत होणार आहे. मागील निवडणुकीत तटकरेंनी अनंत गीते यांना चांगलाच घाम फोडला होता. 15 लाख 13 हजार मतदारांमधून गीतेंना अवघ्या 2 हजार 110 मतांनी विजय मिळवता आला होता. आता पाच वर्षानंतर यात अनेक बदल झालेले आहेत. सलग सातव्यांदा लोकसभेवर जाण्याची संधी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासमोर असली तरी सुनील तटकरे यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाही.

- Advertisement -

काँग्रेस, शेकाप व राष्ट्रवादी अशी युती असून रायगड जिल्ह्यात शेकापची मतदार संख्या जास्त असल्याने याचा फायदा सुनील तटकरे यांना मिळणार आहे. परंतु खासदारकीची निवडणूक राष्ट्रीय धोरणाला मानणारी असल्याने संपूर्ण कोकणात लोक कोणत्या पद्धतीने विचार करतात यावरच दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे एकंदर निवडणुकीत जनता कोणाला पसंती देणार यावरच विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -