फोन टॅपिंगप्रकरणी संजय पांडेंना १६ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

संजय पांडे यांनी कोर्टात दाखल केलेल्या अर्जात म्हटले की, आपण अनेक हायप्रोफाईल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांचा तपास केला तसेच खटले चालवले, यात त्वरित कार्यवाही देखील केल्या.

sanjay pandey remanded judicial custody till august 16 bail hearing tomorrow

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्रकरणी संजय पांडे ईडी कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु आहे. यात मंगळवारी त्यांना रोज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले, यावेळी कोर्टाने संजय पांडे यांना 16 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय पांडे यांचा कोठडीतील मुक्काम 14 दिवसांनी वाढला आहे. यानंतर पांडे यांच्यावतीने कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र कोर्टाने आज संजय पांडेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पांडेंना आता कोठडीतच राहावे लागणार आहे.

संजय पांडे यांनी कोर्टात दाखल केलेल्या अर्जात म्हटले की, आपण अनेक हायप्रोफाईल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांचा तपास केला तसेच खटले चालवले, यात त्वरित कार्यवाही देखील केल्या. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे केलेल्या कर्तव्यावर घेतलेला हा राजकीय सूड आहे. सन 2009 ते 2017 दरम्यान घडलेल्या गुन्ह्याचा तपास 2022 मध्ये केला जात आहे. म्हणजे प्रकरणाच्या सुरुवातीच्या तेरा वर्षांनंतर आणि ते बंद झाल्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा सुरु झाले. तेही मी माझं कार्यालय सोडल्यानंतर एका आठवड्याच्या आता या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. यावरून या प्रकरणाची चौकशी राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे.

संजय पांडे यांच्यावर नेमके आरोप काय?

संजय पांडे यांनी आयआयटी कानपूरमधून कंप्यूटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर ते १९८६ बॅचचे आयपीएस ऑफिसर असून ३० जून २०२२ रोजी ते सेवानिवृत्त झाले. संजय पांडे पोलीस सेवेत दाखल होण्याआधी त्यांची आय सिक्युरिटी ही एक आयटी कंपनी होती. या आयटी कंपनीकडून विविध कंपन्यांचं ऑडिट केलं जायचं. याच कंपनीवर २०१० ते २०१५ या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सिक्युरिटी ऑडिट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

यादरम्यान नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये को लोकेशन घोटाळा झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी तपास यंत्रणांनी अलीकडेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन सीएमडी चित्रा रामकृष्णन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. दरम्यान सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने देखील मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सिक्युरिटी ऑडिट करण्यासाठी संजय पांडे यांच्या कंपनीला कोट्यवधी रुपये देण्यात आले होते. मात्र ऑडिटच्या आडून त्यांच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप केला जात आहे. ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निवृत्तीनंतर लगेच 30 जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते.


टेरर फंडिंग प्रकरणात एटीएसकडून परवेज झुबेरला अटक