घरताज्या घडामोडी'कोस्टल रोड'मुळे महालक्ष्मी देवीच्या समुद्रातील कुंड धोक्यात; सामाजिक कार्यकर्त्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे

‘कोस्टल रोड’मुळे महालक्ष्मी देवीच्या समुद्रातील कुंड धोक्यात; सामाजिक कार्यकर्त्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Subscribe

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईचे महालक्ष्मी देवीच्या समुद्रातील कुंडाचे रक्षण करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश मजगुणकर यांनी केली आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील महालक्ष्मी देवीच्या सुमद्रातील कुंडाचे रक्षण करा, अशी मागणी एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. राजेश मजगुणकर असे या व्यक्तीचे नाव असून या व्यक्तीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच साकडे घातले आहे. त्यांनी यबाबत उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

राज्यात अनेक ठिकाणी देवीच्या मंदिरात देवीची कुंड आहेत. त्याप्रमाणे मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देखील देवीचे कुंड आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी ते हाजीअलीजवळ कोस्टल रोडचे काम सुरु आहे. त्यामुळे महालक्ष्मी मंदिराच्या समुद्रातील देवीच्या कुंडांची जपवणूक व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश मजगुणकर यांनी केली आहे. कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकण्यात येत असताना गोड्या पाण्याचे दहा झरे (कुंड) नष्ट होऊ शकतात. भराव टाकताना देवीच्या कुंडांची जागा सुरक्षित असावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.


हेही वाचा – खरे योगी असल्याचा पुरावा द्या; ओवैसींचं योगी आदित्यनाथांना आव्हान


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -