घरमुंबईगिरगावात ७ हजार चौरस फूट महारांगोळी

गिरगावात ७ हजार चौरस फूट महारांगोळी

Subscribe

गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात तब्बल ७ हजार चौरस फुटाची महारांगोळी काढण्यात आली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात तब्बल ७ हजार चौरस फुटाची रांगोळी काढण्यात आली आहे. गिरगाव येथील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित आणि रंगशारदा, स्वास्थ्यरंग यांच्या सहकार्याने ‘ज्योतीने तेजाची आरती’ या विषयावर आधारित भारतमातेच्या रक्षणासाठी भारतीय वायुसेनेने केलेले सर्जिकल स्ट्राईक आणि अभिनंदन ही संकल्पना घेऊन ही महारांगोळी रेखाटण्यात आली आहे. यंदाचे हे यात्रेचे १७ वे वर्ष असून या वर्षीची यात्रा ‘ज्योतीने तेजाची आरती’ या संकल्पनेवर आधारित आहे. पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले प्रांगण माधवबाग, सी पी टँक येथे ही महारांगोळी ३० मार्चपर्यंत सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.

२५ कलाकारांनी काढली महारांगोळी

ही महारांगोळी काढण्यासाठी तब्बल ७ तास लागले असून एकूण २५ कलाकारांनी मिळून ही रांगोळी काढली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी खास पुण्याहून आलेले गणेश खरे, अक्षय जोशी, नामवंत ज्येष्ठ रांगोळी कलाकार महादेव गोपाळे, किशोर सावंत, प्रदीप मदन आणि सुनील चव्हाण आदींच्या सहकार्याने ही रांगोळी काढण्यात आली आहे.

- Advertisement -

अशी काढण्यात आली महारांगोळी

भारतमातेच्या रक्षणासाठी भारतीय वायुसेनेने केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि अभिनंदन ही संकल्पना घेऊन ७ हजार स्क्वेअर फूटाची महारांगोळी काढण्यासाठी ६०० किलो रंग आणि २०० किलो सफेद रांगोळी लागली आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गुढीपाडव्याच्या शुभदिनी गिरगांवातील फडके श्री गणेश मंदिरापासून निघणारी ‘स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान’ आयोजित ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ अर्थात ‘गिरगांवचा पाडवा’ मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही रांगोळी काढण्यात आली आहे.  – डॉ. तेजस लोखंडे, अध्यक्ष, स्वास्थ्यरंग.

- Advertisement -

मुंबईकरांनी मोठ्या संख्येने महारांगोळी पाहण्यास यावे. तसेच नऊवारी साडी नेसण्याच्या प्रशिक्षण शिबिरात भाग घ्यावा, असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष शैलेश रायचुरा, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुजित मोरे, सचिव श्रीधर आगरकर आणि यात्रा प्रमुख तनय वैद्य यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -