घरमुंबईमॉडेल असलेल्या २७ वर्षाच्या अभिनेत्रीवर लैगिंक अत्याचार

मॉडेल असलेल्या २७ वर्षाच्या अभिनेत्रीवर लैगिंक अत्याचार

Subscribe

मॉडेल असलेल्या एका २७ वर्षाच्या अभिनेत्रीवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मॉडेल असलेल्या एका २७ वर्षाच्या अभिनेत्रीवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी बलात्कारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. अमीत अग्रवाल असे या आरोपीचे नाव असून त्याने या दोघांच्या शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडीओ तिच्या मित्रांना पाठवून बदनामी केल्याचा आरोप आहे.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशची रहिवाशी असलेली ही तरुणी सध्या जोगेश्वरी परिसरात राहते. तिने आतापर्यंत काही मालिकांसह हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिचा होणारा पती हा वकिल असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. पाच वर्षांपूर्वी तिला अमीतने फेसबुकवर एक मॅसेज पाठविला होता. मात्र ती त्याला ओळखत नसल्याने तिने त्याला ब्लॉक केले होते. त्यानंतर तो तिला व्हॉटअपवर मॅसेज पाठवू लागला. तिला फोन करु लागला. त्यामुळे तिने त्याला भेटून समज देण्याचे ठरविले होते. जानेवारी २०१८ रोजी तिने अंधेरीतील एका हॉटेलमध्ये त्याची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली होती. काही दिवसांनी त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. फेब्रुवारी २०१८ रोजी ते दोघेही एका पार्टीत गेले होते. तिथे अमीतने मद्यप्राशन केले होते. त्यानंतर ते दोघेही त्याच्या घरी गेले. तिथेच त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन त्यांच्या संबंधाचे मोबाईलवरुन व्हिडिओ काढले होते. त्यानंतर तो तिला वेगवेगळ्या हॉटेल, रिसॉर्टमध्ये घेऊन गेला आणि तिथेही त्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. प्रत्येक वेळेस त्याने त्याच्या मोबाईलवरुन व्हिडिओ बनविले होते.

- Advertisement -

अश्लील व्हिडीओ मित्रांना पाठवून केली बदनामी

एप्रिल २०१८ रोजी ती त्याचा मोबाईल पाहत होती. त्यावेळी तिला तिच्यासह इतर काही तरुणीचे अमीतसोबत शारिरीक संबंधाचे व्हिडिओ सापडले. ते व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने मोबाईलमधील सर्व व्हिडिओ डिलीट करुन त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. संबंध तोडून टाकल्यानंतर तो संतप्त झाला आणि त्याने तिच्या घरात जाऊन तिथे प्रचंड धिंगाणा घालून तिला मारहाण केली. तिने पूर्वीसारखे संबंध ठेवले नाहीतर तिचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. हीच धमकी देऊन तो तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार करीत होता. तिला घरात कोंडून ठेवून तिच्यावर सतत पाळत ठेवत होता. या छळाला कंटाळून ती तिच्या उत्तर प्रदेशातील गावी निघून गेली. जून २०१८ रोजी ती पुन्हा मुंबईत आली होती. याच दरम्यान त्याने तिच्या काही मित्रांना त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हॉटअपवर पाठवून दिले आणि तिची बदनामी केली होती. हा प्रकार मित्रांकडून समजताच तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने अमीत अग्रवालविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमीतविरुद्ध पोलिसांनी बलात्कारासह अन्य भादवी आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत लवकरच अमीतची पोलिसांकडून चौकशी होणार असून या चौकशीनंतर त्याच्यावर कारवाईचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहे.


वाचा – अकरा वर्षांच्या मुलीवर वयोवृद्धाकडून लैगिंक अत्याचार

- Advertisement -

वाचा – ८ वर्षाच्या मुलावर लैगिंक अत्याचार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -