घरताज्या घडामोडीलोअर परेलमधील रघुवंशी मिलमधील शोरुमला आग!

लोअर परेलमधील रघुवंशी मिलमधील शोरुमला आग!

Subscribe

मुंबई लोअर परेल येथील रघुवंशी मिलमधील शोरुमला आग लागल्याचे समोर येते आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलातील जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

ही आग शॉक सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. पण आगीचं नेमकं हे कारण काय का? याबाबत देखील नंतर तपास केला जाणार आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी महापौर किशोरी पेडणेकर दाखल झाल्या आहेत. आज सकाळी नरिमन पॉईंटजवळील ‘बँक ऑफ बहरीन आणि कुवैत’ येथे भीषण आग लागली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Breaking: नरिमन पॉईंट येथील ‘बँक ऑफ बहरीन आणि कुवैत’ इमारतीला आग!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -