घरताज्या घडामोडीएड्स नियंत्रण मंडळामध्ये प्रकल्प संचालकपदी श्वेता सिंघल यांची नियुक्ती

एड्स नियंत्रण मंडळामध्ये प्रकल्प संचालकपदी श्वेता सिंघल यांची नियुक्ती

Subscribe

एड्स नियंत्रण मंडळामध्ये प्रकल्प संचालकपदी श्वेता सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१८ पासून ते जानेवारी २०२० पर्यंत तुकाराम मुंढे यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली होती. पण, तुकाराम मुंढेंची बदली झाल्यानंतर हे पद जानेवारी महिन्यापासून रिक्त होतं. या रिक्त पदावर प्रकल्प संचालक श्वेता सिंघल या रुजू झाल्या आहेत. गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक हे पद रिक्त होतं. त्यानुसार, या पदावर तुकाराम मुंढे यांची २०१८ साली नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, तुकाराम मुंढे यांची बदली केली आणि ते नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झाले.

साताऱ्याच्या नुतन जिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळला होता

राज्य सरकारने नव्याने काढलेल्या आदेशांनुसार तब्बल ८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अश्विनी मुदगल, पी. सिवा शंकर, सुनील चव्हाण, श्वेता सिंघल अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. श्वेता सिंघल यांची मुंबईतील महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होतं. २०१७ साली श्वेता सिंघल यांनी साताऱ्याच्या नुतन जिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळला होता. सिंघल यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. मंत्रालयात त्यांनी कामगार विभागाच्या उपसचिव म्हणून कार्यरत होत्या. बुधवारी संध्याकाळी त्यांना एड्स नियंत्रण मंडळामध्ये प्रकल्प संचालक हे पद देण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शीव हॉस्पिटलच्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांना करोनाचे प्रशिक्षण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -