घरमुंबईझोपुच्या ‘आसरा’ अ‍ॅपचा शुभारंभ

झोपुच्या ‘आसरा’ अ‍ॅपचा शुभारंभ

Subscribe

झोपडपट्टीवासियांना विविध सोयीसुविधा, योजना यांची माहिती होण्याच्या दृष्टीने ‘आसरा’ अ‍ॅपचा उपयोग नक्कीच होईल. या विभागाने त्यांच्या संपूर्ण कामकाज आणि व्यवहाराचे डिजिटलायझेशन करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ मोबाईल अ‍ॅपचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ‘आसरा’ मुळे प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता येऊन त्याचा झोपडपट्टीधारकांना उपयोग होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर व गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार उपस्थित होते.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने डिजिटलायझेशनची चांगली सुरूवात केली आहे. झोपडपट्टीवासियांना विविध सोयीसुविधा, योजना यांची माहिती होण्याच्या दृष्टीने ‘आसरा’ अ‍ॅपचा उपयोग नक्कीच होईल. या विभागाने त्यांच्या संपूर्ण कामकाज आणि व्यवहाराचे डिजिटलायझेशन करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रारंभी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी अ‍ॅपचे सादरीकरण करुन माहिती दिली. झोपूने कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शकता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता आणण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -