Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी भरीव तरतूद; मैदानं भाड्याने देण्याचे संकेत

यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी भरीव तरतूद; मैदानं भाड्याने देण्याचे संकेत

Subscribe

मुंबई महानगरपालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आज मुंबई महापालिकेचा 2023- 24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी शिक्षण खात्याचा 3 हजार 347.13 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. मागील वर्षी 3 हजार 370.24 कोटींचा अर्थसंकल्प अंदाज जाहीर करण्यात आला होता. 2022-23 च्या तुलनेत 2023-24 वर्षाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान 23 कोटी 11 लाख रुपयांनी कमी आहे.

गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महापालिकेने क्रीडा केंद्रे उभारण्यासह, किचन गार्डन प्रकल्प, संगणक प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण, बोलक्या भिंती, नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्राची उभारणी आणि महसूल वाढीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे.

- Advertisement -

शिक्षण समितीच्या अर्थसंकल्पात जुने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत. तसेच उत्पन्नाचे अनेक नवे स्त्रोत शोधण्याचे संकेतही या अर्थसंकल्पातून देण्यात आले आहेत. यासह उत्पन्न वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शालेय इमारतींवर जाहिराती, बॅनर्स उभारणी, वर्गखोल्या अभ्यासिका, वाचनालय, खासगी शिकवण्या भाडेतत्वावर उपलब्ध देण्यासह शाळा परिसरातील मैदानं आणि अन्य संस्था या क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाडेतत्वावर देण्याचे संकेत देखील अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या प्राथमिक विभागातील 88 शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर नाविन्यपूर्ण गणित आणि विज्ञान केंद्रांची उभारणी, मुलांची एकाग्रता, आकलन क्षमता वाढवण्यासाठई 54 खगोलशास्त्रीय प्रयोगशाळांसाठी 60 लाखांची तरतूद, गुणवत्ता वाढीसाठी गुणवत्ता कक्षाची स्थापना, ऑलिंपियाड परिक्षांसाठी 38 लाखांची तरतूद केली आहे.

- Advertisement -

आधुनिक शिक्षणासाठी मुंबई महापालिकेने टॅब पुरवठा, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर 3.20, ई वाचनालय 10 लाख, डिजीटल क्लासरुमसाठी 12 कोटीच्या घरात तरतूदी केल्या आहेत.

महापालिकेच्या शाळांमध्ये प्रसिक्षण आणि उपक्रमांना महत्त्व देण्यासाठी रस्ता सुरक्षा दल, शाळाबाह्य मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यासाठी 28 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तर 2022 ते 2025 कालावधीत शाळा इमारतींच्या देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींची तरतूद केली आगे.

यासह पालिका शाळांमधील संगणक प्रयोगशाळा अद्यावत करण्यासाठी एकूण 10.32 कोटींची तरतूद केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन सॉफ्टवेअर, अधिक क्षमतेने, वेगाने वापरण्यास मिळणार आहे. यासह 245 प्राथमिक शाळांमध्ये बोलक्या संरक्षक भिंतीची निर्मिती करण्यासह, 249 शाळांमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टप्प्याटप्प्याने आवडीच्या क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल, यासाठी 28.45 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात आहे.

तसेच शहर, पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये स्वतंत्र असे प्रत्येकी एक क्रीडा संकुल आणि 25 क्रीडा केंद्रे उभारण्यासाठी, 469 शालेय इमारतीत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील 94 हजार 240 विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजेबल पाऊच बेंडिग यंत्राचा पुरवठा करण्याची, शाळेत जाण्या-याण्यासाठी बेस्टचे चलो स्मार्ट कार्ड देण्याची, अपंग विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्य खरेदी करण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासह या अर्थसंकल्पात 13,00 वर्गखोल्या डिजिटल आणि 50 प्राथमिक शाळांमध्ये ई-वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्माण केली जाणार असून त्याबाबत धोरणं आखलं जाईल. यात बदलीस पात्र झालेल्या शिक्षकांना 20 शाळांचा पसंतीक्रम देण्यात येणार असून त्याप्रमाणे शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासह शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी 391 शाळांच्या इमारतींमध्ये जेलफोन फायर स्प्रे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मी राजीनामा देतो, माझ्याविरोधात वरळीतून लढून दाखवा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -