घरमुंबईह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या.., सुषमा अंधारेंचा नवनीत राणांवर पलटवार

ह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या.., सुषमा अंधारेंचा नवनीत राणांवर पलटवार

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. शिवसेनेने आता संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे-फडणवीस गटासमोर नवे आव्हान उभे केले आहे. परंतु राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केली. त्यावरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यात दम असता तर ते असं घरात बसले नसते, अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती. यावर आमच्याकडे एक म्हण आहे. ह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडार मार.., आपला मतदारसंघ सोडून दारोदार हनुमान चालिसा म्हणत फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून संपूर्ण राज्याला कोरोना सारख्या महामारीतून वाचवणे हे जास्त पुण्याचे काम आहे. तसेच हे उद्धव ठाकरेंनी चोखपणे पार पाडले आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

- Advertisement -

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

शिवसेनेत बंड करून जे आमदार बाहेर पडले आहेत. ते स्वत:च्या हिंमतीवर बाहेर पडले आहेत. संभाजी ब्रिगेडबाबत सर्वांच्या मनात आदर आहे. परंतु उद्धव ठाकरेंमध्ये दम नाहीये, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यात दम असता तर घरी बसले नसते, असं नवनीत राणा म्हणाल्या.

- Advertisement -

एका जुन्या प्रकरणात सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझे आणि उद्धव ठाकरेंचे व्यक्तीगत काही वाद नाही. उद्धव ठाकरे यांनाच नवनीत राणा, रवी राणा आणि हनुमानाची अडचण आहे. ही त्यांची अडचण असल्याने तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे.


हेही वाचा : …तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार; एकनाथ खडसेंनी ठणकावले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -