…तर राज ठाकरेंच्या शिष्यत्वाचा गंडा बांधायला तयार; सुषमा अंधारेंचं मनसेला खुले आव्हान

सुषमा अंधारे यांच्या टीकेवर मनसैनिक संतप्त झाले. मनसेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांनी तर सुषमा अंधारे यांची सभा उधळून लावण्याची धमकी दिली. या धमकीला सुषमा अंधारे यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, मी पाठीमागे बोलत नाही. अपना एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा. मी जे बोलते ते अत्यंत वस्तुस्थिती आणि सत्य बोलते. आजारपणाची टिंगल करणं हे कोणत्याही सुसंस्कृत, सभ्य, संवेदनशील माणसाला रुचणारं नाही.

sushma andhare

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. सुषमा अंधारे या जाहीर सभेत शिंदे-सरकार व त्यांच्या आमदारांवर टीका करतात. मुलुंडच्या सभेत तर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सुषमा अंधारे यांच्या टीकेवर मनसैनिक संतप्त झाले. मनसेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांनी तर सुषमा अंधारे यांची सभा उधळून लावण्याची धमकी दिली. या धमकीला सुषमा अंधारे यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, मी पाठीमागे बोलत नाही. अपना एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा. मी जे बोलते ते अत्यंत वस्तुस्थिती आणि सत्य बोलते. आजारपणाची टिंगल करणं हे कोणत्याही सुसंस्कृत, सभ्य, संवेदनशील माणसाला रुचणारं नाही.

पुढे त्या म्हणाल्या, मुलुंडच्या सभेत मी मांडलेले मुद्दे चुकीचे आहेत असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. मी चर्चा करायला तयार आहे. त्यांनी खुल्या सभेत माझ्याशी चर्चा करावी. राज ठाकरे जे बोलले ते मांडण महाराष्ट्राच्या किती हिताचं होतं हे त्यांनी सांगावं. माझी त्यावर बोलण्याची तयारी आहे. त्यांनी मला त्यांचा मुद्दा पटवून दिला तर मी त्यांच्या शिष्यत्वाचा गंडा बांधायला तयार आहे, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी मनसेला दिले.

ते मुद्दयांची भाषा गुद्द्यांवर नेणार असतील तर शिवसेनेला गुद्द्यांची भाषा कुणीही शिकवण्याची गरज नाही. राडा संस्कृतीचा एनसायक्लोपिडिया शिवसेनेने लिहिला आहे हे विसरु नका, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी मनसेला दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. एरव्ही राज ठाकरे हे आदेश देतात आणि कार्यकर्ते सक्रिय होतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाशिवाय मनसे कार्यकर्ते सुषमा अंधारे यांच्या सभेत राडा घालणार का हे बघावे लागेल.