घरमुंबईनवरात्रौत्सवावर स्वाईन फ्लूचे सावट

नवरात्रौत्सवावर स्वाईन फ्लूचे सावट

Subscribe

ऐन नवरात्रौत्सवाचा काळात जिल्ह्यात आतापर्यंत 57 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळल्यामुळे ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. जिल्ह्यातील 1 लाख सहा हजार 794 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 57 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यापैकी 18 जण उपचार घेऊन घरी परतले. तर 33 जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मागील दहा दिवसांत दोघांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यामध्ये 14, कल्याणात 14, नवी मुंबईत 18 तर मीरा-भाईंदरमध्ये स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आढळले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात स्वाईन फ्लूने डोके वर काढल्यामुळे ठाणेकरांच्या उत्सवावर मर्यादा आली आहे.

प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ठाणे महानगर पालिकेच्या वतीने काही खासगी रुग्णालयांसह पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांकरिता विशेष कक्ष उघडण्यात आले आहेत. कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. हा आजार संसर्गजन्य आहे. हवेतून त्याचा प्रसार होत असतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी ठाणेकरांनी जाऊ नये, सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, शक्यतो तोंडाला मास्क लावावेत. निलगिरीच्या तेलाचा वापर करावा असे आवाहन ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 18 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 14 रुग्ण ठाण्यातील आहेत आणि 4 रुग्ण ठाण्याबाहेरील आहेत. या रुग्णांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील दोन रुग्ण ठाणे शहरातील आहे तर दोन रुग्ण ठाण्याबाहेरील आहेत. ज्युपिटर रुग्णालयात 16 जण उपचाराकरिता दाखल झाले होते. त्यापैकी तिघाजणांचा मृत्यू झाला आहे. तर बेथनी रुग्णालयात दोन जण दाखल झाले होते.

डॉ.आर.टी.केंद्रे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठामपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -