घरताज्या घडामोडीधक्कादायक! संगणक शिक्षकाकडून १४ विद्यार्थींनीचा विनयभंग

धक्कादायक! संगणक शिक्षकाकडून १४ विद्यार्थींनीचा विनयभंग

Subscribe

नवी मुंबईतील पालिकेच्या शाळेमध्ये संगणक विषय शिकवणाऱ्या शिक्षकांने १४ हून अधिक विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नवी मुंबईतील पालिकेच्या शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेच्या शाळेतील एका नराधम शिक्षकाने १४हून अधिक विद्यार्थ्यांचा विनयभंग केला असून या नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. लोचन परुळेकर, असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

नवी मुंबईतील पालिकेच्या एका शाळेत एसआरएच्या फंडातून संगणक देण्यात आलेले होते. त्यामुळे हा शिक्षक पालिकेच्या इयत्ता ६वी ते ८वीच्या विद्यार्थींनींना संगणक शिकवण्यासाठी येत होता. तो पालिकेचा शिक्षक नसल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो संगणक शिकणाऱ्या विद्यार्थीनींचा विनयभंग करत होता. विद्यार्थींनीनी सुरुवातीला या प्रकाराची वाच्यता केली नाही. मात्र, हा प्रकार अधिकच वाढू लागल्याने या विद्यार्थींनीनी शिक्षकांकडे तक्रार केली. त्यामुळे शाळेनेही या प्रकाराची गंभीर दखल घेऊन नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही तक्रार दाखल होताच या नराधम शिक्षकाला अटक केली आहे.

- Advertisement -

खासगी शिकवणी घेणारा शिक्षक

हा पालिकेच्या शाळेचा शिक्षक नसून तो खासगी शिकवणी घ्यायचा. तो शाळांमध्ये जाऊन संगणक हा विषय शिकवायचा. त्यामुळे हा शिक्षक आणखी कोणत्या शाळांमध्ये खासगी शिकवणी घेत होता? तिथेही त्याने असा प्रकार केला आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास घेत असून या नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.


हेही वाचा – सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाने केला पत्नीचा खून

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -