घरताज्या घडामोडीCoronaVirus: ठाण्यातील जांभळी भाजीपाला मार्केट स्थलांतरित करणार

CoronaVirus: ठाण्यातील जांभळी भाजीपाला मार्केट स्थलांतरित करणार

Subscribe

जांभळी भाजीपाला मार्केट तात्पुरत्या स्वरूपात शहरात इतरत्र हलविणार असल्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग लोकांमध्ये पसरू नये यासाठी वारंवार सूचना देऊनही सोशल डिस्टसिंग नियमाचे पालन न केल्यामुळे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी गुरुवारी जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केटची पाहणी केली. हे मार्केट तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या विविध भागांमध्ये हलविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

गुरुवारी दुपारी पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांसमवेत जांभळी नाका मार्केटची पाहणी केली. यापूर्वीही त्यांनी या मार्केटची पाहणी करून तेथील घाऊक आणि किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टसिंगचा नियम पाळण्याविषयी सूचित केले होते. त्यानंतर मुख्य मार्केट बंद करून ते तलाव पाळी आणि सुभाष पथ याठिकाणी मार्किंग करून तिथे स्थलातंरीत करण्यात आले होते. याबाबत महापालिका आणि पोलिस प्रशासनाने अनेकवेळा हस्तक्षेप करूनही सोशल डिस्टसिंग नियमाचे उल्लघंन झाल्याने अखेर पाहणी करून महापालिका आयुक्त सिंघल यांनी सदरचे भाजीपाला मार्केट शहराच्या विविध भागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

- Advertisement -

सदरचे भाजीपाला मार्केट आता पारसिक रेतीबंदर, पोखरण रोड नं. १, हायलँड मैदान आणि घोडबंदर रोड येथील डी मार्टच्या मागील बोरिवडे मैदान या ठिकाणी स्थलातंरित करण्यात येणार आहे. या चारही ठिकाणी आवश्यक त्या किमान सुविधा पुरविण्याबाबत त्यांनी संबंधित विभागाला आदेशित केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त (२) समीर उन्हाळे, परिमंडळ २चे उपायुक्त संदीप माळवी, सहाय्यक पोलिस आयुक्त तडवी, ठाणे नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमवंशी, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मारूती गायकवाड आदी अधिकारी होते.


हेही वाचा – मुंबईतील कोरोनाच्या धोक्याकडे मुख्य सचिवांचे दुर्लक्ष!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -