घरमुंबईरेल्वेत १२९ वर्षे जुने घड्याळ आजही दर्शवते अचूक वेळ

रेल्वेत १२९ वर्षे जुने घड्याळ आजही दर्शवते अचूक वेळ

Subscribe

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कारखान्यात कर्मचार्‍यांना वेळ समजावी म्हणून १८८९ साली ब्रिटिशांनी एक घड्याळ बसवले. हे घड्याळ १२९ वर्षे जुने आहे. मात्र आजही ते अचूक वेळ दाखवते. या घड्याळाने दाखवलेल्या वेळेनुसार, घंटानाद करून कर्मचार्‍यांना वेळेची सूचना देण्यात यायची. आज घंटानाद नसला तरी घड्याळ वेळ सांगण्यात कोणतीही कसूर करत नाही. त्याचे श्रेय या घड्याळ्याची देखभाल करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून खास नेमलेल्या कर्मचार्‍याला जाते.
1870 ते 1876 या काळात ब्रिटिशांनी ट्रेन बोगीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लोअर परळ वर्कशॉप सुरू केले. तब्बल 14 हेक्टर परिसरात असलेल्या विस्तृत जागेत सद्यस्थितीत सुमारे 3 हजार 500 कर्मचारी आहेत.

यात सुमारे 250 महिलांचा समावेश आहे. वर्कशॉपचे वैशिष्ट्य म्हणजे, 1889 मध्ये कार्यान्वित झालेले भिंतीमधील हेरिटेज घड्याळ आज 129 वर्षांनंतरही सुस्थितीत कार्यरत आहे. हे घड्याळ मेसर्स जिलेट अँण्ड कंपनी तयार केले आहे. १८८९ मध्ये हे हेरिटेज घड्याळ पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कारखान्याच्या भिंतीमधील हे हेरिटेज घड्याळ लावण्यात आले असून आजसुद्धा कर्मचार्‍यांना कामाची निश्चित वेळ घंटानाद करून दाखवते. या घड्याळाला इंग्लंड मध्ये १८४४ मध्ये बनविण्यात सुरुवात केली होती. त्यानंतर हे घड्याळ तयार झाल्यावर लोअर परेल कारखान्यात लावण्यात आले.

- Advertisement -

या घडाळ्याला शेविंग ब्रेल इंटिरियल यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोड देत, स्वरसंयोजन घंटीला नैसर्गिक स्वरूप दिले. सोबत वेळेत घड्याळाची घंटी वाजेल याची व्यवस्था करण्यात आली होती. या बेलची कास्ट संख्या १२२, वजन ५७ किलो, ४२५ मि.मी. या डायमीटर आणि उंची ४३० मि.मी. आहेत. असेच घड्याळ लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या यांत्रिक इंजिनिअरिंग भवनमध्येसुद्धा आहेत. प्रत्येक घडाळ्याच्या वरच्या भागात दोन स्ट्रिंग लाईन आणि अभिलेखाच्या खालीदेखील दोन स्ट्रिंग लाईन आहेत. या घड्याळाला चालविण्याकरिता मेटल स्प्रिंगला आठवड्यातून एकदा चावी द्यावी लागते. त्यांच्या माध्यमातून आठवडाभर हे ऐतिहासिक घड्याळ सुरु असते.

स्वतंत्र कर्मचार्‍याची नियुक्ती

- Advertisement -

ऐतिहासिक लोअर परेल वर्कशॉपच्या घड्याळाची देखभाल करण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक वॉच अँड क्लॉक रिपेअरची नियुक्ती केली आहे. नॉर्बट पीटर डिमेलो असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. या कर्मचार्‍याने आपलं महानगरशी चर्चा करतानी सांगितले की, या संपूर्ण घड्याळाला दोन काटे असून हे घड्याळ कास्य धातूने बनवले आहेत. पश्चिम रेल्वेकडून या हेरिटेज घड्याळाच्या देखरेखीवर विशेष लक्ष ठेवले जाते. आठवड्यातून दोनदा किंवा एकदा घड्याळाचे ग्रीस केले जाते. सोबतच या घड्याळसाठी एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. जिथे पंख्याची व्यवस्था केली असून उष्णतेपासून घड्याळाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. नॉर्बट पीटर डिमेलो यांनी सांगितले की, आज या घडीला १२९ वर्ष झाले. मात्र जर अशीच देखभाल केली तर पुढे १०० वर्षेही घड्याळ अशाच तर्‍हेने सुरु राहील.

मला लोअर परेलच्या ऐतिहासिक घड्याळाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज १२९ वर्षे होऊनदेखील घड्याळ सुरळीत सुरु आहे. यामागचे कारण म्हणजे या घड्याळाची रोज योग्य देखभाल केली जाते. आठवड्यातून घड्याळाला एकदा चावी द्यावी लागते. त्यानंतरही घड्याळ आठवडाभर सुरळीत सुरु असते. हे लोअर परेलच्या ऐतिहासिक घड्याळ असून देखरेख करणे आमची जबाबदारी आहे.
नॉर्बट पीटर डिमेलो , वॉच अँड क्लॉक रिपेअर

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -