घरमुंबईअंधेरीत आईची हत्या करणाऱ्या मुलाला अटक

अंधेरीत आईची हत्या करणाऱ्या मुलाला अटक

Subscribe

वडिलांचे भूत दिसल्याने मारहाणीचा दावा

मुंबई: अंधेरी येथे राहणार्‍या सुनिता कुलदिप सिंग या 49 वर्षांच्या फॅशन डिझायनर महिलेच्या मृत्यूप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा तिचा मुलगा लक्ष कुलदिप लायर (22) याला अटक करण्यात आली. रविवारी त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमली पदार्थाच्या नशेत घरात आलेल्या लक्षला आईच्या अंगात वडिलांचे भूत दिसल्याने त्याने आपल्या आईला हाताने तसेच लाथेने मारहाण केली होती. त्यात सुनिता यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

या घटनेची एकमेव साक्षीदार आणि लक्ष याची प्रेयसी अ‍ॅशप्रिया अमितेश बॅनर्जी हिची सध्या ओशिवरा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात तिला साक्षीदार किंवा सहआरोपी करण्याबाबत निर्णय झालेला नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, क्रॉसगेट इमारतीच्या ए विंगच्या तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 301 मध्ये सुनिता सिंग ही तिचा 22 वर्षांचा मुलगा लक्ष याच्यासोबत राहत होती. लक्ष हा मॉडेलिंग क्षेत्रात असून त्याची अ‍ॅशप्रिया अमितेश बॅनर्जी प्रेयसी आहे. अनेकदा ती त्याच्या घरी येत होती. दोन दिवसांपूर्वी या दोघांनाही सुनिता या बाथरुममध्ये पडल्याचे दिसले. सुनिताला त्यांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात सुनिता यांच्या चेहर्‍याला आणि मानेवर गंभीर दुखापत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

- Advertisement -

जबानीत विसंगती

ओशिवरा पोलिसांनी सुनिताचा मुलगा लक्ष, त्याची प्रेयसी अ‍ॅशप्रिया, मित्र निखील प्रेमचंद राय, नोकर जितेशकुमार हिरालाल गोस्वामी, पंडित भोला महावीरदास पांडे यांची जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत लक्ष आणि अ‍ॅशप्रिया हे दोघेही विसंगत माहिती देत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी बोलते केले होते.

आईत दिसले भूत

गुरुवारी पहाटे साडेतीन ते चार वाजता लक्ष, अ‍ॅशप्रिया आणि निखील हे ड्रग्जचे सेवन करुन घरी आले होते. काही वेळानंतर निखील तेथून निघून गेला. लक्ष आणि अ‍ॅशप्रिया हे घरी आल्यानंतर लक्षला त्याच्या आईच्या शरीरात त्याच्या वडिलांचे भूत दिसले होते. या भूतामुळे तो बैचेन झाला आणि त्याने त्याची आई सुनिता सिंग हिला हाताने तसेच लाथेने मारहाण केली होती. त्यात ती जागीच कोसळली होती.

- Advertisement -

भूत काढण्यासाठी पंडित आणला

त्यानंतर लक्षने आपल्या आईला बाथरूममध्ये ठेवले. सकाळी साडेआठ वाजता आपल्या आईच्या अंगातील भूत काढण्यासाठी एका पंडितला घेऊन आला. मात्र सुनिता सिंग यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. पोलीस तपासात आलेल्या या माहितीनंतर शुक्रवारी रात्री उशिरा लक्ष कुलदिप लायर याला पोलिसांनी अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -