गुजरातचे सिंह मुंबईत तर इथले वाघ गुजरातेत

26 सप्टेंबर रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गुजरात दौऱ्यावर गेले होते. तेव्हा गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी मुनगंटीवार यांनी या सिंहांबाबत चर्चा केली होती.

मुंबई मधील बोरिवली येथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरातमधील आशियायी सिंहाची जोडी आता दाखल झाली आहे. गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी आज बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहे. सिंहाच्या या जोडीची भर पडली आहे. सिहांचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील वाघाची एक जोडी गुजरातला पाठवण्यात येणार आहे.

26 सप्टेंबर रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गुजरात दौऱ्यावर गेले होते. तेव्हा गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी मुनगंटीवार यांनी या सिंहांबाबत चर्चा केली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी उद्यानात पाठविण्यासंदर्भात दोघांचेही एकमत झाले होते आणि त्यांनतर गुजरातमधील आशियायी सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. तर मुंबईतील लवकरवाघ गुजरातला रवाना होणार आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे 12 हेक्टर कुंपण क्षेत्रामध्ये 1975-1976 मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली. सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पण केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्यामुळे इथल्या सिंहांची संख्या कमी झाली. मागील महिन्यात 17 वर्षीय सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला होता.

दरम्यान 70 वर्षांनंतर भारतामध्ये चित्ते परतले आहेत. यापूर्वी 1952 मध्ये देशातून चित्त्यांची प्रजात नष्ट झाली होती. भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 सालात भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली भारतात पुन्हा चित्ते आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यावर्षी 2022 मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. पोजेक्ट चित्ता साठी भारत सरकारने एकूण 90 ते 92 कोटी रुपये एवढा खर्च केल्याचे बोलले जात आहे.


हे ही वाचा – गौतमी पाटीलच्या डान्सवर आवर घाला अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडू; मनसेचा इशारा