घरमुंबईसत्तासंघर्षाचा निकाल देशाला दिशा देणारा असेल - अरविंद सावंत

सत्तासंघर्षाचा निकाल देशाला दिशा देणारा असेल – अरविंद सावंत

Subscribe

मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल आज (11 मे) कोणत्याही क्षणी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असे कायेदतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले असताना ठाकरे गटाचे अरविंद सावंत म्हणाले की, सत्तासंघर्षाचा निकाल देशाला दिशा देणारा असेल.

अरविंद सावंत म्हणाले की, सत्तासंघर्षाच्या निकालात आम्ही मुद्दे सांगतो, पण ते मुद्दे न सांगता फक्त आमच्या बाजूने निर्णय लागणार एवढेच सांगतात. पण त्यांनी कोणती कायदेशीर बाजू केली अस कधी त्यांना विचारल का. मुळात आजचा विषय आहे तो महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही आहे, तो उभ्या देशाला दिशा देणार असणार आहे. महाराष्ट्रातली घटना आहे आणि त्या घटनेला धरून आपण निर्णय देत असाल तर पक्षात्तर बंदीचा कायदा आणला का. तो आणण्यामागे हेतू काय होता. यापूर्वी सुद्धा पक्षात्तर होत होती. हा नवीन कायदा तेव्हा त्यांना वाटलं एवढी मोठी प्रमाणात पक्षात्तर होणार नाही अशी अपेक्षा होती कायदे आणताना, पण पक्षांत्तर झाले. पक्षांत्तर झाले तेव्हा ते दोन तृतीयांश एका वेळेला नाही झाले. त्याच्यामध्ये असा मुद्दा आहे की, किमान दोन तृतीयांश असतील तर त्यांना सुद्धा वेगळा गट किंवा वेगळा पक्ष करता येणार नाही, त्यांना विलिन करावे लागेल, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

- Advertisement -

गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे काही आमदारांसह अचानक थेट गुजरातला निघून गेले. ते का निघून गेले. त्याचे कारण काय, याची चर्चा सुरु झाली. अखेर भाजपच्या मदतीने शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याचे स्पष्ट झाले. तेथून शिवसेना फुटीचा प्रवास सुरु झाला. शिवसेनेचा एक एक आमदार शिंदे यांच्या गटात सामील होत होता. त्याचवेळी महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीचा व्हीप जारी करण्यात आला. या बैठकीला एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले 16 बंडखोर आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची नोटीस जारी करण्यात आली. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही नोटीस जारी केली. त्याचदरम्यान 16 बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस जारी केली.

या दोन्ही नोटीसचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला. त्यावर सुनावणी सुरु असतानाच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. तेही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचले. याच गोंधळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. सत्तासंघर्षाचा निकाल आज कोणत्याही क्षणी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे या सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -