घरमुंबई'या' सनदी अधिकाऱ्यांना लागलीये राजकारणाची ओढ

‘या’ सनदी अधिकाऱ्यांना लागलीये राजकारणाची ओढ

Subscribe

सात माजी शासकीय कर्मचारी आणि सध्या सेवेत असलेला एक आयएफएस अधिकाऱ्यांना राजकारणात येण्याची ओढ लागली आहे.

१९९० च्या दशकात मुंबईमधील गुन्हेगारी विश्वाची कंबर मोडणारे आयपीएस अधिकारी सत्यपाल सिंह सेवानिवृत्त झाल्यानंतर यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्या ते केंद्रीय मंत्री आहेत. आता सत्यपाल सिंहानंतर अनेक सरकारी अधिकारी राजकारणात येऊ इच्छित आहेत. माजी सनदी अधिकारी आणि सध्या सेवेत असलेला एक आयएफएस अधिकाऱ्याला राजकारणात येण्याची ओढ लागली आहे. हे अधिकारी २०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवू इच्छित आहे.

पहिला सनदी अधिकारी राजकारणात

महाराष्ट्र देखील या स्विच ट्रेंडसाठी अनोळखी नाही. महाराष्ट्रामधून सनदी अधिकाऱ्याची नोकरी करुन राजकारणात प्रवेश करणारे चिंतामनराव देशमुख हे पहिले अधिकारी होते. चिंतामनराव देशमुख हे केंद्रीय मंत्री आणि अर्थमंत्रालयाचे प्रमुख होते. तसंच ते १९५० साली अर्थमंत्री बनले होते.

- Advertisement -

यांनी लोकसभा निवडणुक लढवली

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये दोन माजी आयएएस अधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव एन. रमा राव आणि माजी म्हाडा उपाध्यक्ष चंद्रशेखर यांनी आंध्रप्रदेशातून निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. १९८७ च्या बॅचच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे तिकीट ऑफर केले होते. मात्र या आयएएस अधिकाऱ्याने तिकीट नाकारले होते.

किशोर गजभिये – ६० वर्ष

१९८७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी

- Advertisement -

निवृत्त – सचिव, सामाजिक न्याय विभाग

संभाव्य मतदारसंघ – उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघ

संभाव्य पक्ष – काँग्रेस

”माझ्या कार्यकाळात मला असे समजले की, बदल घडवण्याची इच्छा असेल तर तो आपण घडवू शकतो. त्यासाठी आपण राजकारणात असणे आवश्यक आहे. मी ५१ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि २०१३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. मी २०१३ मध्ये नागपूरमधील एमएलसी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविली. तर २०१४ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक नागपूरमधून बसपाच्या तिकीटावर लढवली. मात्र पराभूत झालो. मी मागच्या वर्षी फेब्रुवारीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मला वाटते की, भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षाला काँग्रेसकडून पराभूत केले जाऊ शकते.”

हिकमत उढाण – ५३ वर्ष

१९९१ च्या बॅचचे उपजिल्हाधिकारी

निवृत्त – अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुंबई

संभाव्य मतदारसंघ – घनसावंगी विधानसभा मतदार संघ, जालना

संभाव्य पक्ष – शिवसेना

“मी २०१४ ची विधानसभा निवडणुक लढलो मात्र पराभूत झालो. मी पुन्हा निवडणुकीला उभा राहू इच्छितो. मला सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे. मला माझा मतदारसंघ विकसित करायचा आहे.”

ज्ञानेश्वर मुळ्ये, ६० वर्ष

१९८३ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी

पद – परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव. ३१ जानेवारीला निवृत्त होणार आहे.

संभाव्य मतदारसंघ – कोल्हापूर लोकसभा मतदार संघ

संभाव्य पक्ष – भाजप

“राजकारण हा निवृत्तीनंतरचा पर्याय आहे. यामध्ये मी किती पुढे जाईल हे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे.”

विजय नहाटा , ६५ वर्ष

१९९५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी

निवृत्त – विभागीय आयुक्त, कोकण

संभाव्य मतदारसंघ – बेलापूर विधानसभा मतदार संघ

संभाव्य पक्ष – शिवसेना

” २०१४ मध्ये मी विधानसभा निवडणुक लढवली. मात्र माझा ३,६०० मतांनी पराभव झाला. मला प्रचारासाठी फक्त १० दिवस मिळाले होते. मी आधीच शिवसेना उपाध्यक्ष आहे. मला आमदार म्हणून चांगले काम करण्याची इच्छा आहे.”

प्रभाकर देशमुख – ६३ वर्ष

१९९५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी

निवृत्त – विभागीय आयुक्त, कोकण

संभाव्य मतदारसंघ – माढा लोकसभा मतदारसंघ, सोलापूर जिल्हा

संभाव्य पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस

” मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे. जल संवर्धनाच्या कामामध्ये देखील मी सहभागी आहे. मी सरकारच्या जलयुक्त शिवार या योजनेची जनजागृती केली आहे. तसंच शिक्षण क्षेत्रात देखील काम केले आहे. निवडणुकीच्या स्पर्धेत सहभागी होण्याच्या अनेक संधी माझ्याकडे आहेत.”

शामसुंदर शिंदे – ६३ वर्ष

१९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी

निवृत्त – उत्पादन शुल्क आयुक्त

संभाव्य मतदारसंघ – नांदेड विधानसभा मतदार संघ आणि लोकसभा मतदार संघ

संभाव्य पक्ष – भाजप

” मी लोकांना चांगल्या सोयी-सुविधा देऊ इच्छितो. मराठवाडा मागास भाग आहे आणि मला तो विकसित करायचा आहे.”

उत्तम खोब्रागडे – ६६ वर्ष

१९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी

निवृत्त – आदिवासी कल्याण विभागाचे मुख्य सचिव

संभाव्य मतदारसंघ – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ

संभाव्य पक्ष – काँग्रेस

“मी समाजसेवा करत असून ती मी अशीच सुरु ठेवू इच्छितो. बेस्टचा मी माजी व्यवस्थापक आहे. २००४ मध्ये काँग्रेसने मला तिकीट देऊ केले होते. मात्र मी त्यावेळी नोकरीचा राजीनामा दिला नाही. मी २०१८ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.”

संभाजी झेंडे – ६१ वर्ष

१९९३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी

निवृत्त – म्हाडाचे उपाध्यक्ष

संभाव्य मतदारसंघ – पुरंदर लोकसभा मतदार संघ, पुणे

संभाव्य पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस

“माझे वडील सदाशिवराव झेंडे हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मी गेल्या १० वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे. माझे मेहुणे राधाकृष्ण विखे- पाटील हे सुध्दा राजकारणात आहेत. माझे काही नातेवाईक काँग्रेसमध्ये आहेत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -