घरमुंबईमुंब्य्रात तरूणांची वाहतूक पोलिसांना मारहाण; व्हिडीओ व्हायरल

मुंब्य्रात तरूणांची वाहतूक पोलिसांना मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

राडा बघण्यासाठी जमलेल्या गर्दीत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाइलसुद्धा चोरीला गेला.

वाहतूक पोलिसांनी परवाना परत न केल्याने काही तरूणांनी राडा करत वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना मुंब्य्रात घडली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरूण त्या वाहतूक पोलिसांवर अक्षरशः तुटून पडल्याचे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, यावेळी काही तरूणांनी वाहतूक पोलिसांचा गळा आवळण्याचा देखील प्रयत्न केला. तरूणांचा हा राडा पाहण्यासाठी बघ्यांची खूप गर्दी झाली होती. या गर्दीमुळेच एका पोलिसाचा मोबाईलसुद्धा चोरीला गेला. या घटनेमुळे मुंब्य्रात कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसल्याचे सिद्ध होते.

महिलेसह काही जणांनी राडा केला

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक कारवाई सुरु होती. यावेळी मुंब्रा कन्व्हर नगर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांनी काही दुचाकीस्वारांना पकडलं होतं. त्यावेळी एका महिलेसह काही तरूणांनी राडा करण्यास सुरूवात केली. यावेळी तरूणांनी वाहतुक पोलिसांवर हात उचलला. पैकी काही जणांनी वाहतूक पोलिसाचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. अंगद मुंडे, प्रशांत गोसावी, दिनेश राऊत व विनायक वाघमारे अशी मारहाण झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘महक’च्या रहिवाशांचा उल्हासनगर महापालिकेवर मुकमोर्चा

पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाइल चोरला

दरम्यान हा राडा पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती. या गर्दीत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईलसुद्धा चोरीला गेला. या राडा प्रकरणी अफनान कुरेशी, शमसुद्दीन अहमद बांगी, तमसील अफाक कुरेशी व फैजान शेख या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी तिघांना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -