घरताज्या घडामोडीकरोना अपडेट - कल्याणमधील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ!

करोना अपडेट – कल्याणमधील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ!

Subscribe

जगभरात सध्या करोना व्हायरसची दहशत पसरली आहे. भारतात दिवसेंदिवस करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कल्याणमध्ये दोन नव्याने करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यात करोनाची संख्या आता ३७ वरून ३९वर गेली आहे. देशात १११ पेक्षा जास्त रुग्ण असून एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक ३९ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईत सहा, पुणे सात, पिंपरी चिंचवड नऊ, नागपूर चार, यवतमाळ तीन, कल्याण तीन, नवी मुंबई तीन, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी एक अशी सध्या राज्यातील करोना बाधितांची आकडेवारी आहे. मुंबई, पिंपरी चिंचवड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू केली आहे. तसंच मुंबई आणि पुण्यात खासगी कंपन्यांना घबसरल्या काम करण्याचे आवाहन देखील केलं आहे.

- Advertisement -

जगभरात १,५६,४०० लोकांना करोनाची लागण झाली. त्यापैकी ५,८३३ जणांचा मृत्यू झाला. तसंच आता जगभरातील ७३, ९६८ करोना बाधित या आजारातून पू्र्णपणे बरे झाले आहेत, असं जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी या संशोधन संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार चीनमध्ये सर्वाधिक करोना बाधित आहेत.

- Advertisement -

कशी घ्याल काळजी?

आपण योग्य ती स्वच्छता राखली पाहिजे. कोणत्याही खाद्यपदार्थाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत. तसेच कोणत्याही सार्वजनीक ठिकाणी, रुग्णलयात जाण्यापूर्वी चेहऱ्यावर मास्क लावावे. खोकला, शिंक आल्यास तोंडावर, नाकावर रूमाल धरावा. पाळीव प्राण्यांशी संपर्क मर्यादित ठेवला पाहिजे. इतरांच्या आसपास असताना चेहऱ्यावर मास्क लावणे. मास्क वापरल्याने तोंडातून होणार संक्रमण काही प्रमाणात टाळता येऊ शकते.


हेही वाचा – CoronaVirus: चीनच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात मुझफ्फरपूर कोर्टात याचिका दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -