घरमुंबईउल्हासनगर पोलिसांनी केली 'ही' मोठी कारवाई

उल्हासनगर पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Subscribe

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस एकाच दिवसात मोटरसायकल-टेम्पो-मोबाईल चोरीच्या तीन गुन्ह्यांचे यशस्वी डिटेक्शन केले आहे.

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस एकाच दिवसात मोटरसायकल-टेम्पो-मोबाईल चोरीच्या तीन गुन्ह्यांचे यशस्वी डिटेक्शन केले आहे. याप्रकरणी सुमारे पाच लाखाचा ऐवज ताब्यात घेताना दोन अल्पवयीन (विधी संघर्षीत बालके) मुलांसह चौकडीला अटक करण्यात करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी ही माहिती दिली. विठ्ठलवाडी, अंबरनाथ, उल्हासनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल, टेम्पो व मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. स्थानिक पोलीस आरोपींचा मागोवा घेत असताना या तिन्ही गुन्ह्यातील आरोपींची गुप्त माहिती एकापाठोपाठ मिळत गेली. पोलिसांनी तक्रार नोंदवून त्वरीत कारवाई केल्यामुळे या गुन्ह्याचा तपास करण्यात यश मिळाला आहे.

सापळा रचून केले अटक

विठ्ठलवाडीच्या हद्दीत पावणेदोन लाख किमतीचे मोबाईल चोरणारा चोर १७ सेक्शन येथील मोबाईल बाजारात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचण्यात आला. या कारवाईत एका अल्पवयीन मुलाला (विधी संघर्षीत बालक) ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

चौकशीदरम्यान दिली कबूली

अंबरनाथच्या मोरीवली भागात चोरीच्या टेम्पोचा नंबर बदलण्यासाठी आलेल्या सिद्धार्थ गायके उर्फ ताराचंद याच्यावर करण्यात आली. तसेच सम्राट अशोक नगरात राहणाऱ्या अमित कोतपिल्ले याला पकडले असता त्याने एका विधी संघर्षीत बालकाच्या मदतीने ३ स्कुटर व एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. अशाप्रकारे एकाच दिवसात तीन यशस्वी डिटेक्शन करण्यात यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले. तीन ठिकाणी सापळा रचून आरोपींवर झडप घालण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, वसंत पाटील, रमजू सौदागर, सुरेंद्र पवार, आर. टी. चव्हाण, भरत नवले, संजय माळी, रामदास मिसाळ, रामदास जाधव, विश्वास माने, जावेद मुलानी, विठ्ठल पदभेरे, बाबूलाल जाधव, योगेश पारधी या टीमने केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -