घरठाणेWater supply : कडक उन्हाळ्यात ठाण्यात पाणी पुरवठा बंद

Water supply : कडक उन्हाळ्यात ठाण्यात पाणी पुरवठा बंद

Subscribe

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रात्री 12 ते शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रात्री 12 वाजेपर्यत असा एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभागसमितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभागसमिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होनार आहे.

- Advertisement -

हेही वाचा- Water supply : ठाणे ग्रामीण भागात पाण्याचा दुष्काळ; शहापूर, मुरबाडमध्ये 32 टँकरने पुरवठा

पाण्याच्या टाकीची दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने दिवा, कळवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत. अशा वेळी खऱ्या अर्थाने ठाणे महानगरपालिकेने अतिरिक्त पाणीपुरवठा साठवून ठेवून, ज्या वेळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवेल अशावेळी टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. पण असे कधीच होताना नाही दिसत, पाणी पुरवठा ज्या वेळी दुरुस्तीच्या कामाकरिता बंद असतो नंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येते अशा वेळी दिवा परिसरातील नागरिकांना पाणीच मिळत नाही, म्हणजे गुरुवारी पाणी पुरवठा बंद झाले कि डायरेक्ट शनिवार किंवा रविवार पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होऊन नागरिकांना पाणी मिळते. पण दुरूस्तीचे काम झाले कि तात्काळ पाणी नागरिकांना मिळत नाही. याकडे देखील ठाणे महानगर पालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे.

- Advertisement -

सदर कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा-Turmeric Water : रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्या, निरोगी राहा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -