घरमुंबईसंप मागे घ्या, नाहीतर मानधन कापणार!

संप मागे घ्या, नाहीतर मानधन कापणार!

Subscribe

पालिकेने दिलेल्या परिपत्रकात 'आरोग्य सेविका ३० जानेवारीपर्यंत कामावर रुजू न झाल्यास त्यांना बडतर्फ केलं जाईल', असं स्पष्ट शब्दांत नमूद केलं आहे.

पालिकेच्या आरोग्य सेविकांनी त्यांच्या काही प्राथमिक मागण्यांसाठी सोमवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर संप पुकरला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस असून, पालिकेने मात्र हा संप त्वरित मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरोग्य सेविकांन संप त्वरित मागे घ्यावा आणि लवकरात लवकर कामावरु रुजू व्हावे’ असा आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. इतकंच नाही तर ‘संप त्वरित मागे घ्या नाहीतर मानधन कापले जाईल’ असा धमकी वजा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे. याशिवाय ‘संपावर गेलेल्या महिला आरोग्य सेविकांची सेवा खंडित करून, त्यांच्याजागी नवीन आरोग्य सेविकांची भरती केली जाणार आहे’, असंही पालिकेने काढलेल्या परिपत्रात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संप मागे न घेतल्यास थेट आरोग्य सेविकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेने दिलेल्या परिपत्रकात ‘आरोग्य सेविका ३० जानेवारीपर्यंत कामावर रुजू न झाल्यास त्यांना बडतर्फ केलं जाईल’, असं स्पष्ट शब्दांत नमूद केलं आहे.

पालिकेच्या आरोग्य विभगाकडून देण्यात आलेलं परिपत्रक

आम्हाला आरोग्य विभागाकडून आंदोलन मागे घेण्याचं पत्र आलेलं आहे. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. कारण, आधीच आम्हांला सरकारकडून फसवलं गेलं आहे. याविषयी कृती समितीकडे ही चर्चा सुरू आहे. अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे, आरोग्य सेविका आंदोलन मागे घेणार नाही हे स्पष्ट आहे.– अॅड. प्रकाश देवदास, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष

आरोग्य सेविकांच्या काम बंद आंदोलनावर परिपत्रक काढलेले आहे. अनेक विषयांवर कामं सुरू आहेत. लसीकरण सुरू आहे आणि आरोग्य सेविकांच्या वेतनाचा प्रश्न हा न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे आरोग्य सेविकांनी पुकारलेलं हे आंदोलन चुकीचंच आहे.  ३० जानेवारीपर्यंत जर या आरोग्यसेविका कामावर रुजू झाल्या नाही तर, आम्ही नव्या आरोग्य सेविकांची भरती करुन घेऊ. त्यामुळे आरोग्य सेविकांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावं.
– डॉ. पद्मजा केसकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी, पालिका 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -