जागतिक युवक कौशल्य दिन; कोहिनूर इन्स्टिट्यूटमध्ये प्रात्यक्षिक कुशल सप्ताह

आज जागतिक युवक कौशल्या दिवस आहे. या दिनानिमित्ताने कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रात्यक्षिक कुशल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

World Youth Skills Day demonstrative week in Kohinoor Technical Institute
जागतिक युवक कौशल्य दिन; कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रात्यक्षिक कुशल सप्ताह

गेली ५७ वर्षांपासून तांत्रिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये (केटीआय) ‘वर्ल्ड यूथ स्किल डे’ निमित्त स्किल कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले असून आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमामध्ये केटीआयतर्फे जीवनशैलीसाठीच्या कौशल्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. स्किल कार्निव्हलच प्रॅक्टीकल वीकचे (प्रात्यक्षिक कुशल सप्ताह) आयोजन कोहिनूरच्या देशभरातील ५० शाखांमध्ये करण्यात आले आहे.

प्रात्याक्षिक अनुभवाला मिळणार चालना

स्पर्धात्मक कार्यसंस्कृतीमध्ये, प्रत्येकाला नोकरी मिळवण्यासाठी तसेच ती मिळाल्यानंतर कंपनी किंवा संस्थेत स्वतःची प्रगती साधण्यासाठी विशेष कौशल्य अंगी असणे आवश्यक झाले आहे. या स्किल कार्निव्हलच्या माध्यमातून, देशातील प्रत्येक तरुण रोजगारक्षम व्हावा, यासाठी केटीआयतर्फे जागरुकता निर्माण करण्यात येत आहे. या कार्यक्रमादरम्यान, ‘प्रॅक्टीकल विक’ देखील आयोजित करण्यात आला असून केटीआयच्या ७० टक्क्यांपर्यंत महत्व असलेल्या प्रात्यक्षिक अनुभवाला यातून चालना देण्यात आली. केटीआयच्या प्रोग्राम डिलीव्हरीचे हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. उद्योगक्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकतानाच प्रात्यक्षिकांचा अनुभव दिला जातो.

असा असतो उपक्रम 

प्रॅक्टीकल विकद्वारे, केटीआयच्या शाखांतर्फे १३ ट्रेड्सपैकी प्रत्येक आठवड्याला २ ट्रेड्सची निवड करण्यात येत असून या अंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम दिले जातात. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते गुरुवार दररोज विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल आणि ट्रेनिंगसाठी विषय दिला जाईल. शुक्रवारी विद्यार्थी मागील दिवसांत जे काही शिकले त्याची उजळणी करण्यासाठी वेळ घेऊ शकतात. त्यानंतर, परिक्षकांच्या एका टीम समोर त्यांना आपल्या आकलनाचे सादरीकरण करायचे असते. शनिवारी, विद्यार्थी ब्रांचमधील परिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करतील. विद्यार्थ्यांना मूल्यांकन देण्याची जबाबदारी परिक्षकांची असून अन्य विद्यार्थी प्रकल्पाविषयी प्रश्न विचारू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांचा त्या त्या विषयाचा पाया मजबूत होण्यास मदत होते.

आजच्या नवीन पिढीला त्यांच्या करीयरची सुरूवात करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये मिळवून देण्यासाठी आपण मदत करणे हे महत्त्वाचे आहे. यामुळे फक्त नवीन पिढीसाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक मजबूत पाया रचला जातो. कौशल्य प्रशिक्षणाचे तीन आधार स्तंभ आहेत. सरकारची धोरणे आणि पायाभूत सुविधा, उद्योगक्षेत्र आणि कौशल्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था. एक कौशल्य प्रशिक्षक संस्था या नात्याने आम्ही या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. आता प्रतीक्षा आहे ती आमच्या या प्रयत्नांना जोरदार पुष्टी मिळण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि उद्योग कारखाने यांच्या सहाय्याची.
– मकरंद वागास्कर, केटीआयचे सीओओ

हेही वाचा – World Emoji Day: हे इमोजीस तुमच्या आयुष्यात ‘स्माईल’ आणणात!