घरनवी मुंबईएपीएमसी बाजारांचे उत्पन्न वाढविण्यावर भर - पणन मंत्री बाळासाहेब पाटील

एपीएमसी बाजारांचे उत्पन्न वाढविण्यावर भर – पणन मंत्री बाळासाहेब पाटील

Subscribe

राज्यातील बाजार समितीचे उत्पन्न वाढवून शेतकरी व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारच्या जाचक अटींचा परिणाम हा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर आर्थिक उत्पन्नावर होत आहे. राज्यातील बाजार समितीचे उत्पन्न वाढवून शेतकरी व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. आज गुरुवार १२ ऑगस्ट रोजी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एपीएमसीतील भेट देऊन पाचही मार्केटमधील समस्यांचा आढावा घेतला. त्याच प्रमाणे शेतकरी व बाजार समितीचे संचालक व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पनणमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक डक, प्रभारी संचालक स दीपक देशमुख, संबंधित अधिकारी वर्ग आणि बाजार घटक उपस्थित होते.

नियमनमुक्तीने संपूर्ण व्यापारपद्धती कोलमडली असल्याने व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे. मागील वर्षांपासून कोरोनामुळे बाजारातील अनेक घटक उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहेत. तर कोरोना काळात सुद्धा जीव धोक्यात घालून पोटाची खळगी भरणाऱ्या बाजार समितीच्या काही घटकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अशा काळात मार्केटला नवसंजवनी देण्यासाठी सरकारने विविध योजनांची आखणी केली असून विशेष 2 हजार कोटींच्या पॅकेजची तयारी केली असल्याचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

मागील अनके वर्षांपासून धोकादायक अवस्थेतील कांदा बटाटा मार्केटची बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली. सरकार लवकरच या मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेणार असल्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
राज्यातील सर्वच ठिकाणच्या बाजार समितीच्या शाखांमध्ये येणारे शेतकरी, व्यापारी व इतर घटक यांना एकत्र घेऊन बाजार समित्यांमधून आर्थिक उलाढाल सरकार वाढविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. एपीएमसी मार्केट मधील सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधा देण्यासंदर्भात बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

हेही वाचा –

 

- Advertisement -

पवारांचा हुबेहूब आवाजाला वापरले एप, अखेर पोलिसांना सापडलाच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -