घरनवी मुंबईLok sabha Election 2024 : नवी मुंबईकरांनो मतदान 'हा' तुमचा अधिकार

Lok sabha Election 2024 : नवी मुंबईकरांनो मतदान ‘हा’ तुमचा अधिकार

Subscribe

पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे मतदान करण्याचे आवाहन

नवी मुंबई : २५ ठाणे लोकसभा निवडणूकीचे मतदान २० मे रोजी असून जास्तीत जास्त नवी मुंबईकर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

मतदानात नागरिकांचा सहभाग वाढावा यादृष्टीने पालिकेमार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून १४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ऐरोली येथील डॉ.आंबेडकरांच्या स्मारकात अभिवादन करण्यासाठी नागरिकांची अधिक उपस्थिती असते हे लक्षात घेत मतदानाविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा…Summer Vacation : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईजवळील ही ठिकाणे करा एक्सप्लोर

महापालिकेचे आयुक्त डॉ.शिंदे यांनी स्मारकाला भेट दिली असता निवडणूक मतदान विषयक प्रचाराचे काम करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांसह मतदान करण्याबाबत आवाहन करणारे समुह छायाचित्र काढून त्यांना प्रोत्साहित केले.
याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त शरद पवार, समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, उपायुक्त सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, अजय संखे व प्रवीण गाडे, ऐरोली विभाग अधिकारी अशोक अहिरे, समाज विकास अधिकारी सर्जेराव परांडे, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे आदी अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

मतदानातून आपला हक्क बजावा-डॉ.संजीव नाईक
ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांनी उपस्थित राहून डॉ.आंबेडकरांना वंदन केले. जयंतीचे औचित्य साधून महापालिकेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाक्षरी अभियान राबविले. डॉ.नाईक यांनी स्वाक्षरी केली तसेच मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ ग्रहण करीत सर्वांना मतदानातून आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले. यावेळी माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी नगरसेवक अशोक पाटील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -