घरपालघरवसईसाठी केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी

वसईसाठी केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी

Subscribe

यावेळी खासदार राजेंद्र गावित बोलताना गावीत यांनी ही माहिती दिली. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यावेळी उपस्थित होते.

वसईः वसई विरारसाठी केंद्र सरकारकडून एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून त्यातून घनकचरा प्रकल्प, सांडपाणी प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणलेल्या विविध योजना अत्यंत कल्याणकारी असून त्यामुळे नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे. महापालिकेने अत्यंत कमी वेळेत चांगले नियोजन करून या यात्रेची सुरुवात केली आहे, असे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ नायगाव येथील परेरा नगरमध्ये झाला. यावेळी खासदार राजेंद्र गावित बोलताना गावीत यांनी ही माहिती दिली. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यावेळी उपस्थित होते.

देशातील प्रत्येक नागरिकांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयत्नशील असून त्यांनी केंद्र शासनामार्फत १७ विविध योजना आणल्या आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यामातून या योजनेचा लाभ नागरिकांच्या दारात मिळणार आहे, त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले. केंद्र शासनाकडून नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता, आत्मनिर्भर निधी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री ई-बस योजना, अमृत योजना आदी १७ विविध योजनांचा समावेश आहे. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत शासकीय योजनांची माहिती देणारी व्हॅन २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत एकूण वसई -विरार शहरात एकूण ४९ ठिकाणी फिरणार आहे. या यात्रेत, लाभार्थी म्हणून पात्र असलेल्या व्यक्तींची नोंदणी केली जाणार आहे. असुरक्षित आदिवासी गटासाठी डेव्हलपमेंट मिशन कार्यक्रम लागू करण्यात आला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत लाखो लोकांना शासन आपल्या दारीचा उपक्रमाचा फायदा मिळाल्याचेही खासदार गावित म्हणाले. वसई -विरार शहराला सुर्या प्रकल्पातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पाणी दिले आहे. जनतेची निकड ओळखून उद्घाटन न करता पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. वसईत २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय तयार केले जाणार आहे. जागेचा तिढा आयुक्तांनी सोडवून पूर्तता करावी, असे खासदार गावित यांनी सांगितले. हास्य जत्रा फेम कलाकार अभिनेते अरुण कदम, प्रांत अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार कोष्टी यांच्यासह माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -