घरपालघरBhayander Rape Case: तोडफोड करणार्‍या २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Bhayander Rape Case: तोडफोड करणार्‍या २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Subscribe

तसेच या तोडफोडीत समाविष्ट असलेल्या आणि शांततेत चालणार्‍या शहराचे माहौल बिघडविण्याचे काम काही जण करत आहेत, त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल असे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी कडक शब्दात सांगितले आहे.

भाईंदर :- भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाण्यात चार वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी काही संघटनांनी त्याला धार्मिक रंग देत नवघर पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या सायकल रिपेअरिंग दुकानात व आजूबाजूला तोडफोड केल्याप्रकरणी अनोळखी २० ते २५ जणांवर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या समोर आफताब सल्लाऊद्दीन अन्सारी यांचे सायकलचे दुकान असून ते आपल्या दुकानात १४ एप्रिल रोजी रात्री काम करत असताना त्यांच्या दुकानाच्या शटर व नाव असलेल्या बोर्डाची तोडफोड करून त्यांना मारहाण करण्यात आली.याप्रकरणी तोडफोड करणार्‍या अनोळखी २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पोलीस ठाण्यात जमा झालेल्या जमावाने एक सायकल दुकान, हेअर कटिंग दुकान, अंडा गाडी, ज्यूस गाडा यांचीही तोडफोड केली आहे. सदरील दाखल झालेल्या गुन्हयाचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहेत. तसेच या तोडफोडीत समाविष्ट असलेल्या आणि शांततेत चालणार्‍या शहराचे माहौल बिघडविण्याचे काम काही जण करत आहेत, त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल असे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी कडक शब्दात सांगितले आहे.

पोलीस आयुक्तांकडून कडून नागरिकांना सूचना

- Advertisement -

पोलीस आयुक्तालय परिसरातील नागरिकांना कळविण्यात येते की मीरा-भाईंदर परिसरामध्ये दोन धर्मीयांमध्ये, समाजामध्ये, गटामध्ये तेढ निर्माण होईल या पद्धतीने कोणत्याही प्रकारचे मेसेज मोबाईल, व्हाट्सअप, ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक युट्युब व इतर सोशल मीडियावर मेसेज तयार करून प्रसारित करू नये. तसेच आलेल्या मेसेजला लाईक करेल व सदर मेसेज वर कमेंट करेल व अशा कृत्यामुळे दोन वेगवेगळ्या धर्मीयांच्या, गटाच्या व समाजाच्या भावना दुखावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मेसेज तयार करणारा, प्रसारित करणारा, लाईक करणारा व त्यावर कमेंट करणारे व्यक्तींना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्यांवर कायद्यामधील तरतुदीनुसार भादवि कलम १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४९, १८८, २९५ अ, १५३ अ, सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी) व इतर संबंधित कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा आदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -