घरपालघरबफिंगचा कचरा उचलण्यावरून वाद; कचरा न उचलल्यास कंपन्या बंद ठेवणार

बफिंगचा कचरा उचलण्यावरून वाद; कचरा न उचलल्यास कंपन्या बंद ठेवणार

Subscribe

मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील भाईंदर पूर्वेकडील भागातील औद्योगिक वसाहतीमधून निघणारा बफिंगचा कचरा उचलण्यास महापालिकेने नकार दिल्यामुळे या कचऱ्याच्या विल्हेवाटाचा प्रश्न उभा राहिला आहे.

मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील भाईंदर पूर्वेकडील भागातील औद्योगिक वसाहतीमधून निघणारा बफिंगचा कचरा उचलण्यास महापालिकेने नकार दिल्यामुळे या कचऱ्याच्या विल्हेवाटाचा प्रश्न उभा राहिला आहे. शहरात पडून असलेल्या या कचऱ्यावर महापालिकेकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे औद्योगिक वसाहती मालकांमध्ये नाराजी पसरली असून याविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बफिंगच्या कचऱ्यामुळे महापालिका प्रशासन आणि औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार आमने-सामने आले असून वाद चिघळत जात असल्याचे दिसून येत आहे.

मिरा-भाईंदर शहर हे पूर्वीपासून स्टील उद्योगासाठी नावाजलेले शहर आहे. या शहरात साधारण दोन हजारहून अधिक स्टील कारखाने असून सुमारे ९०० बफिंग कारखाने आहेत. या कंपन्यांमधून दरदिवशी साधारण ६० ते ७० टन बफिंगचा कचरा निघतो. पूर्वी हा कचरा महापालिकेकडून उचलण्यात येत होता. मात्र हा कचरा ज्वलनशील असल्यामुळे महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पात आग लागण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने महापालिकेकडून हा कचरा न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय राज्य शासनाच्या निर्णयानुसार बफिंगच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता मुंबई येथील तळोजा येथे उभारण्यात आलेल्या केंद्रावर हा कचरा पाठवण्याच्या सूचना महापालिकेकडून औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र औद्योगिक वसाहतींनी या आदेशाचे पालन करणार नसल्याचे जाहीर करत विरोध केला आहे.

- Advertisement -

या संदर्भात बफिंग व्यावसायिकांशी चर्चा करण्याकरता पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी महापालिकेच्या हितासाठी आवश्यक असलेला निर्णय घेण्यात येईल. त्यानंतरच बफिंग कचऱ्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल.
– अजित मुठे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य विभाग)

यावर तोडगा काढण्याकरता कारखानदार व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बफिंग कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास महापालिकेकडून शुल्क आकारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कारखानदार संघटनेकडून भाईंदर पश्चिमेच्या मंगलमूर्ती हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरा-भाईंदरला आशिया खंडातील सर्वात मोठी स्टील भांडी निर्मितीची औद्योगिक वसाहत म्हणून ओळखले जात होते. परंतु मागच्या काही वर्षात सुविधा मिळत नसताना आकारल्या जाणाऱ्या करांमुळे स्टील कारखाने इतर राज्यांत स्थलांतरित होत असल्याने मत कारखानदारांनी या बैठीकत व्यक्त केले. कोरोना महामारीच्या आर्थिक संकटात अगोदरच बफिंग कचरा शुल्काचा बोजा टाकला जात असल्याने तो रद्द करावा, अशी भूमिका घेण्यात आली. अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात कारखानदार कामबंद आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र स्टील उद्योग असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पांडे यांनी दिला आहे.

- Advertisement -

मिरा भाईंदर महापालिकेकडून बफिंगचा कचरा उचलण्यास नकार देण्यात आल्यामुळे बफिंग व्यावसायिक नाराज झाले आहेत. व्यावसायिकांच्या मते ते गेल्या कित्येक वर्षांपासून येथे व्यवसाय करत असून महापालिकेला कचरा कर देखील भरत आहेत. मात्र आता महापालिकेकडून देण्यात आलेल्या नव्या सूचनामुळे बफिंगच्या कचऱ्याची विल्हेवाट करण्याकरता तो नवी मुंबई येथील तळोजा येथे पाठवण्यासाठी मोठा खर्च होणार आहे. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिकेनेच घ्यावा, अशी बफिंग व्यावसायिकांची मागणी आहे.

हेही वाचा –

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा वरचष्मा; मविआला मोठा धक्का

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -