घरपालघरप्रेमसंबंधातून तरुणाची हत्या; पुरलेला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या; पुरलेला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

Subscribe

१४ मे रोजी भुईंगावच्या समुद्रकिनारी सापडलेल्या मृतदेहाचा खुलासा झाला असून तरुणाला भाईंदर पूलावरून खाडीत फेकणार्‍या त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

१४ मे रोजी भुईंगावच्या समुद्रकिनारी सापडलेल्या मृतदेहाचा खुलासा झाला असून तरुणाला भाईंदर पूलावरून खाडीत फेकणार्‍या त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी भुईगाव समुद्रकिनारी पुरलेला मृतदेह काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. १२ मेला दीपक बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी कांदीवली पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी तपास सुरु केला असता दीपक त्यादिवशी सूरज विश्वकर्माला भेटल्याची माहिती मिळाली. तपासात प्रेमप्रकरणाचाही खुलासा झाला होता. त्यावरून पोलीस सूरजला ताब्यात घेण्यासाठी घरी गेले असता तो घटनेच्या दिवसापासून फरार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दीपकच्या गायब होण्यामागे सूरजचा हात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून सूरजला उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून अटक केली.

सूरजच्या अटकेनंतर दीपकच्या हत्येचा खुलासा झाला. मालाडच्या मालवणीत राहणार्‍या दीपक काटुकरचे त्यात परिसरात राहणार्‍या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याची माहिती तरुणीच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर सूरज विश्वकर्मा (वय २७) याला लागली. त्यामुळे त्याने दीपकचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. १२ मेला सूरजने दीपकला कांदीवली पूर्वेकडील सरोवर हॉटेलमध्ये बोलावले. तिथून रात्री दोघेही भाईंदर रेल्वे स्टेशनला आले. सूरजने दोघांसाठी बिअर विकत घेतली. नंतर दोघेही पायी चालत वसई खाडीपूलावरून चालत निघाले. ठरल्यानुसार संधी साधून सूरजने पूलावरून खाली खाडीत दीपकला ढकलून दिले आणि तिथून पळ काढला होता.

- Advertisement -

१४ मेला भुईगावच्या समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतेदह आढळला होता. ओळख न पटल्याने शवविच्छेदन करून वसई पोलिसांनी मृतदेह भुईगाव समुद्रकिनारी पुरला होता. दुसरीकडे, कांदीवली पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वसई पोलिसांच्या मदतीने दीपकचा मृतदेह जमिनीतून काढून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

हेही वाचा –

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -