घरपालघरमेहनतीने पिकवले, पावसाने नासवले; भातपिकाचे नुकसान

मेहनतीने पिकवले, पावसाने नासवले; भातपिकाचे नुकसान

Subscribe

गेले काही दिवस सतत बरसत असलेल्या पावसाने जिल्हयातील भातपिके संकटात आली आहेत. भातपिके कापणीस तयार झाली असतानाच पाऊस विश्रांती घेत नसल्याने नासू लागली आहेत.

गेले काही दिवस सतत बरसत असलेल्या पावसाने जिल्हयातील भातपिके संकटात आली आहेत. भातपिके कापणीस तयार झाली असतानाच पाऊस विश्रांती घेत नसल्याने नासू लागली आहेत. हळव्या वाणातील भातपीके येत्या काही दिवसांतच कापणीसाठी तयार होण्याच्या स्थितीत आहेत. काही शेतकऱ्यांची भातपिके कापणीस तयार झालेली आहेत. मात्र गेले दोन-तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने या भातपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या या पिवळ्या सोन्यावर पावसाने दरोडा टाकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पावसाने केलेल्या भात पिकाच्या नुकसानीची तातडीने पाहाणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
– शिवाजी पाटील, शेतकरी, मानिवली वाडा

- Advertisement -

वाडा तालुक्यात १७,५०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २५५० हेक्टर क्षेत्रावर गरव्या वाणातील भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. तर ९३०० हेक्टर क्षेत्रावर निम गरव्या वाणातील भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. तसेच ५६५० हेक्टर क्षेत्रावर हळव्या वाणातील भात पिकाची लागवड करण्यात आली आहे.
हळव्या वाणातील भातपिकांची पेरणी होऊन ९० ते १०० दिवसांचा कालावधी पुर्ण झाला आहे. या पिकाची ९० ते ११० दिवसांत कापणी करणे आवश्यक असते. मात्र, कापणीस आलेल्या भातपिकांच्या शेतात एक ते दिड फुट उंचीपर्यंत पाणी असल्याने या भाताची कापणी करणे अशक्य झाले आहे. यामुळे सोन्यावानी पिकून आलेल्या भाताचे प्रचंड नुकसान होत असल्याचे पाहून येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा –

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे समूळ उच्चाटन करा – नाना पटोले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -