घरपालघरत्याग,पराक्रम,सातंत्र्य पुन्हा दिव्यांनी उजळले

त्याग,पराक्रम,सातंत्र्य पुन्हा दिव्यांनी उजळले

Subscribe

. मशालींच्या दिमाखदार उजेडात, वाद्यांच्या गजरात व जय वज्राई-जय चिमाजीच्या जयघोषात अवघे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.

वसईः मराठा सैन्यामुळे व भारतीय जवानांमुळे आपण दिवाळी आनंदात साजरी करीत आहोत. त्यापराक्रमी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी टीम “आमची वसई” ने दरवर्षी प्रमाणे वसई किल्ल्यात दीपोत्सव साजरा केला. दीपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून व रंगबेरंगी रांगोळ्या काढून नरवीर चिमाजी आप्पा स्मारक उजळवण्यात आले.किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ, तटबंदीवर, सागरी दरवाज्याजवळ व नागेश महातिर्थावरही पणत्या व तोरण लावून रांगोळी काढण्यात आली. भव्य आकाश कंदिल उजळवण्यात आला. मशालींच्या दिमाखदार उजेडात, वाद्यांच्या गजरात व जय वज्राई-जय चिमाजीच्या जयघोषात अवघे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.

सर्वजातीय-सर्वधर्मीय वसईकर जुलमी पोर्तुगीजांच्या जाचातून मुक्त व्हावे,स्वतंत्र व्हावे, सक्तीचा कर, सक्तीचे धर्मांतरण थांबावे व जमिनी-मालमत्ता व जीव सुरक्षित राहावे यासाठी हतबल झालेल्या वसईकरांची कळकळीची विनवणी ऐकून पुणे-कोकण-मावळ- इंदोर -सांगली- सातारा इत्यादी ठिकाणहून भव्य मराठा सैन्य अनेक नदी-डोंगर-दर्‍या- खाड्या पार करत करत उत्तर कोकणात दाखल झाले. वसईत महाभारताप्रमाणे युद्ध झाले. मोहिमेत २५ हजार घोडदळ, ४० हजार पायदळ, ४ हजार सुरुंग तज्ञ, ५ हजार उंट, ५० हत्ती व अनेक पिंडारी समर्पित होते. वसईकरांकडून एकही नवा पैसा न घेता पेशव्यांनी स्वतः कर्ज काढून ३ वर्षे वसई लढवली. दीन व हतबल झालेल्या वसईकरांना सुखी-समृद्ध करण्यासाठी वसई बाहेरील २१ हजार मराठ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
हतबल वसईकर बांधवांच्या घरी दिवाळी- दसरा साजरी व्हावा म्हणून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा व जीवाचा त्याग केला. दिवाळीत एकीकडे संपूर्ण वसई प्रकाशमान होऊन झगमगत असते. तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा व बलिदानाचा साक्षीदार असलेला वसईचा किल्ला मात्र अंधारात असतो. पूर्वापार अनेक परिवार व धर्मसभा वसई किल्ल्यातील नागेश महातीर्थावर व श्री नागेश्वर मंदिर परिसरात दीपावली साजरी करतात. धर्मसभा अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी मंत्रोच्चारात दिपप्रज्वलन केले व मोहिमेस आशिर्वाद दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -