घरपालघरजव्हार स्टेट बॅँकेसमोर वाहतूक नियमांना तिलांजली

जव्हार स्टेट बॅँकेसमोर वाहतूक नियमांना तिलांजली

Subscribe

वाहन चालकांना बेशिस्तपणे वाहन चालवताना किंवा कुठेही थांबवताना कसलीही भीती राहिली नाही.यामुळे पादचारी नागरिकांना या रस्त्यातून चालताना अडचणींना सामोरे जावे लागते.

जव्हार : जव्हार स्टेट बँकेत दररोज खूपच गर्दी होत असते. सध्य स्थितीत असलेली जागा सुध्दा ग्राहकांना अपुरी पडते. त्यांनाही बॅँकेच्या बाहेर उन्हा तान्हात ताटकळत उभे राहावे लागते. त्यात वाहनांच्या बेशिस्तपणामुळे बँकेच्या गेटसमोरच वाहने उभी असल्यामुळे ,ग्राहकांना वाहनांच्या मधून मार्ग काढावा लागत आहे. गेट समोर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकालासुध्दा वाहनचालक दाद देत नाही. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक वर्दळ होऊन कित्येकदा वाहनांचे अपघात झालेत. अशा दुचाकीस्वारांवर नगर परिषद व पोलीस प्रशासनाने कारवाई करून शिस्त लावावी अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे बँके समोरच जव्हारचे पोलीस स्टेशन असूनही आज पर्यंत एकाही वाहनांवर कारवाई झालेली नाही. पोलीस कर्मचार्‍यांसमोरच वाहतूक वर्दळ होत असते. वाहन चालकांना बेशिस्तपणे वाहन चालवताना किंवा कुठेही थांबवताना कसलीही भीती राहिली नाही.यामुळे पादचारी नागरिकांना या रस्त्यातून चालताना अडचणींना सामोरे जावे लागते.

 

- Advertisement -

बेशिस्त वाहन पार्किंगबाबत संबंधित बँकेच्या वॉचमनला सूचना दिल्या आहेत. शिवाय आतापर्यंत १५ दुचाकीस्वारांवर दंड आकारून कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅफिक हवालदार या ठिकाणी लक्ष ठेवून असतात.

-जितेंद्र अहिरराव,पोलीस उप निरीक्षक,जव्हार पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -