घरपालघरमहिला उमेदवारांच्या सुरक्षतेसाठी महिला पोलीसच

महिला उमेदवारांच्या सुरक्षतेसाठी महिला पोलीसच

Subscribe

अशी मागणी डॉ. दिनेश पाटील यांनी केली आहे. तर उमेदवार राहण्याच्या ठिकाणी महिला पोलीसच उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तलयामार्फत देण्यात आली आहे.

भाईंदर :- मीरा -भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून १० फेब्रुवारीपासून महिला उमेदवारांची शारिरीक चाचणी सुरू होणार आहे. पोलीस भरती करता येणार्‍या महिला उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था आयुक्तलयामार्फत शहरातील ४ ठिकाणी करण्यात आली आहे. महिला उमेदवारांच्या राहण्याची सोय करण्यात आलेल्या ठिकाणी आयुक्तलयामार्फत महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करावी अशी मागणी पत्राद्वारे पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. दिनेश पाटील यांनी केली आहे. तसेच महिला उमेदवारांच्या सुरक्षतेकरिता व त्यांच्या समस्या – अडीअडचणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी- कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी डॉ. दिनेश पाटील यांनी केली आहे. तर उमेदवार राहण्याच्या ठिकाणी महिला पोलीसच उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तलयामार्फत देण्यात आली आहे.

मीरा- भाईंदर आयुक्तलयामध्ये होणार्‍या पोलीस भरतीमध्ये आजपर्यंत एकूण ३७,८३८ उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडली आहे. १० फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी२०२३ रोजी पर्यंत महिला उमेदवारांकरीता शारीरिक चाचणी प्रक्रिया नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, भाईंदर (प.) येथे होणार आहे. महिला पोलिसांसाठी एकूण २९७ व चालक म्हणून २ जागांची भरती होणार आहे. पोलीस भरती करता अनेक राज्यांतून महिला उमेदवार येणार आहेत. महिलांच्या अडी-अडचणी अथवा समस्या हे फक्त महिला पोलीसच एक महिला म्हणून समजू शकतात. महिला पोलीस उपलब्ध असल्यास कोणतीही गोष्ट त्यांच्या सोबत व्यक्त करताना मनमोकळेपणाने करू शकतील. त्यामुळे स्व. प्रमोद महाजन सभागृह व नगरभवन इमारतीमधील हॉल व टेरेस शेड, आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, स्व. मिनाताई ठाकरे सभागृह या चार ठिकाणी महिला उमेदवारांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. ज्या प्रकारे पोलीस भरती पारदर्शकपणे पार पाडण्याकरीता सर्व स्तरांवर विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -