घरपालघरभूमिगत श्री मामावंती देवीचा यात्रौत्सव

भूमिगत श्री मामावंती देवीचा यात्रौत्सव

Subscribe

भंडारी समाजाची ग्रामदेवता असलेल्या भूमीगत श्री मामावंती देवीचा यात्रौत्सव येत्या बुधवारी, १८ मे ते २४ मेपर्यंत होणार आहे. १८ मेला देवीची मूर्ती दर्शनासाठी बाहेर काढण्यात येणार आहे.

भंडारी समाजाची ग्रामदेवता असलेल्या भूमीगत श्री मामावंती देवीचा यात्रौत्सव येत्या बुधवारी, १८ मे ते २४ मेपर्यंत होणार आहे. १८ मेला देवीची मूर्ती दर्शनासाठी बाहेर काढण्यात येणार आहे. तर २४ मेच्या संध्याकाळी देवीची मूर्ती मंदिरात पुन्हा भूमिगत केली जाणार आहे. वसई तालुक्यातील विरार पश्चिमेकडील सत्पाळा गावच्या भंडारी समाजाची ग्रामदेवता भूमिगत श्री मामावंती देवी म्हणजे वसई पंचक्रोशीतील विविध समाजातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी, अशी या देवीची ओळख आहे. सत्पाळा गावच्या एका टोकावर भूमिगत श्री मामावंती देवीचे मंदिर असून ही पाषाणरुपी देवी मंदिरातील गाभाऱ्यात कायम भूमिगत स्वरुपात ठेवण्यात आलेली असते. परंपरेनुसार दर तिसऱ्या वर्षी ही भूमिगत देवी बाहेर काढून सत्पाळा गावात आणली जाते. मोठ्या भक्तीभावाने विधीवत सात दिवस देवीचा यात्रोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. पालघर जिल्ह्यातील निरनिराळ्या समाजातील तसेच डहाणू ते मुंबईमधील विविध भागातील अनेक भाविक नवस घेण्यासाठी वा घेतलेल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी या देवीच्या दर्शनाला येतात.

यात्रोत्सवादरम्यान फुलांची वेगवेगळी आरास करुन देवीला सात दिवस दररोज सजवले जाते. तेव्हा देवीचे मोहक रुप डोळ्यात साठविण्यासारखे असते. २०२० साली कोविडच्या प्रार्दुभावामुळे देवीवा यात्रौत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे यावर्षी देवीच्या दर्शनासाठी आतुरलेल्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी भूमिगत श्री मामावंती देवीचा यात्रौत्सव बुधवार, १८ मे २०२२ ते मंगळवार २४ मे २०२२ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

बुधवारी सायंकाळी ५ वाजता देवी माहेरपणासाठी आणि भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर काढण्यात येणार आहे. यात्रोत्सव काळात गुरुवारी सत्यनारायणाची महापूजा व ह.भ.पं. युगंधरा वीरकर, यांचे क्रांतीकारक चरित्रावर सुश्राव्य किर्तन होईल. तर शुक्रवारी ह.भ.पं. युगंधरा वीरकर यांचे संत चरित्रावर सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी लायन्स क्लब आगाशी पुरस्कृत आरोग्य शिबीर, महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम व ह.भ.पं. महंत प्रमोद महाराज जगताप, बारामती, पुणे हयांचे सुश्राव्य प्रवचन होईल. रविवारी श्री मामावंती देवीचा महाप्रसाद (भंडारा) व सृजन विरारनिर्मित विख्यात संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या गीतांची मैफल “ये शाम मस्तानी’ कार्यक्रम पार पडेल. तर सोमवारी भूमिकन्या श्री मामावंती देवी सांस्कृतिक महोत्सव २०२२  असे निरनिराळे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम उत्सव कमिटीमार्फत आयोजित करण्यात आलेले आहेत. मंगळवारी २४ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता बॅण्ड व ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत श्री मामावंती देवीची भव्य मिरवणूक काढून देवी पूर्ववत मंदिरात भूमिगत करण्यात येणार आहे.

हेही वाचा –

नाना पटोलेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार, आता अजितदादा म्हणतात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -