घरराजकारणUddhav Thackeray : 'जर-तर'ला काहीही अर्थ नसतो, अमित शाह का म्हणाले असं?

Uddhav Thackeray : ‘जर-तर’ला काहीही अर्थ नसतो, अमित शाह का म्हणाले असं?

Subscribe

मुंबई : देशभरातील विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते सध्या भाजपसोबत किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सगळेजण भाजपसोबत येत असताना, ४ वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीला जवळ केले होते. आता देशभरातील परिस्थिती पाहता, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत यायचे ठरवले तर भाजपाचा काय निणय असेल, अशी चर्चा आहे, यावर यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad : मोदी जगभरात लोकशाहीच्या नावाने ढोल बडवतात, पण…; आव्हाडांची टीका

- Advertisement -

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडले. यानंतर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी करत, सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पद घेतले. यानंतर शिवसेनेत फूट पडून दोन गट पडले, यातला एक गट भाजपसोबत गेला. दरम्यान, देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहे. देशभरातील विरोधी पक्षांनी अनेक दिग्गज नेते भाजपसोबत जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत महायुतीत येतील का अशा चर्चा सुरू आहेत. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत शाह यांना उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजपसोबत घेणार का असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी अमित शाह म्हणाले, जर – तर ला काही अर्थ नसतो, तुम्हाला काही हेडलाईन मिळणार नाही. तुम्ही उगाच वेळ वाया घालवताय, असं म्हणत याचं उत्तर टाळलं. तुम्ही प्रसारमाध्यमांनी काही गोष्टी आमच्यावरही सोडायला हव्यात. सगळं काही तुम्हीच ठरवणार का?, असा टोला देखील त्यांनी लगावला.

हेही वाचा – Narendra Modi : साईबाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सगळं व्यवस्थित करतील – सुरेश वाडकर

- Advertisement -

विरोधकांची आघाडी सत्तेसाठी एकत्र

अमित शाह म्हणाले, मी पक्षाच्या सिद्धांतावर काम करतो. आमचा पक्ष अनेक पराभव सहन करुन पुढे आला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विजयाची सवय लागली आहे. इंडिया आघाडी कधीच एकसंध नव्हती. इंडिया आघाडीतील उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत. एका सिद्धांतावर काम केल्यानंतर आघाडी होऊ शकते. या आघाडीत फक्त एकमेकांच्या मुलालाच मोठे करण्याचे ध्येय आहे, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला.
विरोधकांची आघाडी ही फक्त सत्तेसाठी एकत्र आलेली आहे. ज्यांना आपल्या मुलाला, मुलीला, जावयाला मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान करावं असं ध्येय आहे, असे यासाठी एकत्र आले आहेत. कुणालाही देशाची चिंता नाही. मुलगा, मुलगी, जावई, भाचे यांना सत्तेच्या पदावर बसवण्याच्या स्वार्थी हेतूने जमलेल्या पक्षांची टोळी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -